गुजरातमधील पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे आमदार अल्पेश ठाकुर आणि आमदार धवलसिंह झाला लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत. गुजरात क्षत्रिय ठाकोर सेनेचे अमित ठाकोर यांनी पत्रकारपरिषदेत ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की आम्हाला पक्षाच्या विचारधारेवर विश्वास आहे.
Amit Thakor,Gujarat Kshatriya Thakor Sena: Alpesh Thakor and Dhavalsinh Zala(former Congress leaders) will soon join BJP, we believe in the party's ideology. pic.twitter.com/nBeds6gqvQ
— ANI (@ANI) July 15, 2019
आमदार अल्पेश ठाकोर आणि धवलसिंह जाला यांनी राज्यसभा पोटनिवडणुकीच्या मतदानानंतर गुजरात विधानसभेचा राजीनामा दिला होता.
तर काही महिन्यापूर्वी गुजरात काँग्रेसवर नाराज असलेल्या आमदार अल्पेश ठाकोर यांनी दावा केला होता की, राज्यातील काँग्रेसचे १५ पेक्षा अधिक आमदार पक्ष सोडणार आहे. त्यांनी म्हटले होते की काँग्रेसमध्ये प्रत्येकजण असंतुष्ट व नाराज आहे. मी इथं राहायला नको असे माझे मन सांगत असून मला स्वतःसाठी आणि गरिबांसाठी सरकारच्या मदतीद्वारे काम करावी लागणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते.