उत्तर प्रदेशच्या अमेठी येथे एका भाजपा कार्यकर्त्याची घरात घुसून गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सुरेंद्र सिंह असं हत्या करण्यात आलेल्या भाजपा कार्यकर्त्याचं नाव असून ते अमेठीतून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव करणाऱ्या भाजपाच्या नेत्या स्मृती इराणी यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय होते होते अशी माहिती आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेठीतील बरौलिया गावाचे ते प्रमुख होते. शनिवारी रात्री उशीरा काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या राहत्या घरात घुसून त्यांच्यावर गोळी झाडली अशी प्राथमिक माहिती आहे. उपचारासाठी त्यांना लखनऊच्या ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात येत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या हत्येनंतर परिसरात खळबळ उडाली असून हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान घटनास्थळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये स्मृती इराणी यांच्या प्रचारामध्ये सुरेंद्र सिंह यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.  सुरेंद्र सिंह यांचा प्रभाव अनेक गावांमध्ये असल्याने त्याचा स्मृती इराणी यांना लाभ मिळाला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amethi bjp surendra singh former village head of baraulia village was shot dead
First published on: 26-05-2019 at 08:27 IST