25 September 2020

News Flash

‘सरकार अंबानींना ३० हजार कोटी देऊ शकते तर, सैनिकांना ‘वन रँक वन पेन्शन’ का नाही’

सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थिती गंभीर बनली आहे. याची किंमत आपल्या जवानांना भोगावी लागत आहे.

राहुल गांधी (संग्रहित छायाचित्र)

सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थिती गंभीर बनली आहे. याची किंमत आपल्या जवानांना भोगावी लागत आहे. त्यातच राफेल घोटाळाही समोर आला आहे. या सर्व गोष्टी परस्परांशी जोडलेल्या आहेत. कारण, काहीही न करता सरकार अनिल अंबानींना ३० हजार कोटी रुपये देऊ शकते तर सैनिकांना ‘वन रँक वन पेन्शन’ का देऊ शकत नाही, असा सवाल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.


राहुल गांधी, माजी सैनिकांसोबत आमची आज खूपच माहितीपूर्ण बैठक झाली. यातून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. ‘वन रँक वन पेन्शन’चाही मुद्दा याद्वारे समोर आला आहे. या बैठकीदरम्यान, पंतप्रधानांकडून अद्याप ‘वन रँक वन पेन्शन’ लागू करण्यात आलेली नाही, असे माजी सैनिकांनी स्पष्टपणे सांगितल्याचे राहुल गांधींनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2018 3:07 pm

Web Title: anil ambani can be given rs 30000 cr for doing nothing but our soldiers cant be given orop says r gandhi
Next Stories
1 केंद्राकडून राफेल डीलच्या निर्णय प्रक्रियेची माहिती सुप्रीम कोर्टाकडे सुपूर्द
2 उत्तर प्रदेशातून संशयीत ‘आयएयसआय’ एजंटला अटक
3 शबरीमला मंदिरात महिला प्रवेशाला समर्थन देणाऱ्या स्वामी संदीपानंद गिरींच्या आश्रमावर हल्ला
Just Now!
X