पश्चिम बंगालच्या निवडणुकीत धर्मनिरपेक्ष पक्षांमध्ये ऐक्य स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी सोमवारी येथे राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. बिहारमधील जे लोक पश्चिम बंगालमध्ये स्थायिक झाले आहेत त्यांनी तृणमूल काँग्रेसला मतदान करावे, असे आवाहनही तेजस्वी यादव यांनी त्यांना केले आहे.

पश्चिम बंगालमध्ये भाजपची प्रगती रोखणे याला आपल्या पक्षाचे प्राधान्य असल्याचे यादव यांनी ममता बॅनर्जी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर वार्ताहरांना सांगितले. तथापि, राजद आणि तृणमूल काँग्रेस यांची आघाडी होणार का, या प्रश्नाला यादव यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले. आगामी निवडणूक ही तत्त्व आणि मूल्य यांची जपणूक करण्यासाठी होईल, असे ते म्हणाले.