15 October 2019

News Flash

मानवी भाषा समजणारे मेंदूतील न्यूरॉन्सचे कृत्रिम जाळे विकसित

भाषा आकलनावर नवा प्रकाश मेंदूत जसे न्यूरॉन्सचे जाळे असते तसे कृत्रिम न्यूरॉन्सचे जाळे तयार करून त्याच्या माध्यमातून मानवी भाषेने संवाद साधणारे बोधनात्मक प्रारूप तयार करण्यात

कृत्रिम न्यूरॉन्सचे जाळे तयार करून त्याच्या माध्यमातून मानवी भाषेने संवाद साधणारे बोधनात्मक प्रारूप तयार करण्यात वैज्ञानिकांना यश आले आहे.

भाषा आकलनावर नवा प्रकाश

मेंदूत जसे न्यूरॉन्सचे जाळे असते तसे कृत्रिम न्यूरॉन्सचे जाळे तयार करून त्याच्या माध्यमातून मानवी भाषेने संवाद साधणारे बोधनात्मक प्रारूप तयार करण्यात वैज्ञानिकांना यश आले आहे. हे प्रारूप इटलीतील सासारी विद्यापीठ व ब्रिटनमधील प्लायमाऊथ या विद्यापीठांनी तयार केले असून त्याचे नाव ‘अ‍ॅनाबेल’ ( आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क विथ अ‍ॅडाप्टिव्ह बिहेवियर एक्सप्लॉइटेड फॉर लँग्वेज लर्निग )असे आहे. हे कृत्रिम न्यूरॉन्सचे जाळे भाषा शिकू शकते व त्यात माणूस त्याला ती भाषा शिकवणारा मध्यस्थ असतो. माणसाला भाषेचे आकलन कसे होते त्यावर या संशोधनामुळे प्रकाश पडणार आहे. आपला मेंदू गुंतागुंतीची बोधनात्मक कार्ये कशी पार पाडतो हे समजण्यात अजून यश आलेले नाही. भाषा व तर्क यांचाही मानवी मेंदूच्या दृष्टिकोनातून उलगडा यात होणार आहे.
माणसाच्या मेंदूत शेकडो न्यूरॉन्स असतात व ते विद्युत संदेशाने एकमेकांशी संपर्क साधत असतात. मेंदू संगणकाप्रमाणे काम करतो असे आपल्याला वाटते कारण संगणकही विद्युत संदेशावरच चालत असतो, पण मेंदू आणि संगणक यांच्यात रचनात्मक फरक असतो व माहिती संस्करण व आकलन प्रणालीत तो जास्त दिसून येतो. संगणक हे माणसाने दिलेल्या आज्ञावलीप्रमाणे काम करतात ,त्यात काही संकेतावली असते. ती संगणक पाळत असतो व त्यानुसार माहितीवर प्रक्रिया करतो किंवा त्यावर आधारित कृती करतो. माणसाच्या मेंदूत अशी कुठली आज्ञावली असते याचे पुरावे नाहीत. अनेक संशोधकांच्या मते आपला मेंदू बोधनात्मक कौशल्ये परिस्थितीनुसार मिळवत असतो व त्यात सुरूवातीला अगदी अपुरे ज्ञान असते. अ‍ॅनाबेल प्रारूपात हा दृष्टिकोन मांडला असून त्यात संकेतावलीवर आधारित भाषा नसते. न्यूरॉन्सचे जाळे मानवी वाटाडय़ा मार्फत दोन मूलभूत प्रणालींच्या माध्यमातून भाषा शिकते; त्यात सिनॅप्टिक प्लास्टिसिटी व न्यूरल गेटिंग यांचा समावेश असतो. सिनॅप्टिक प्लास्टिसिटी म्हणजे दोन न्यूरॉनमधील संदेशवहन कार्यक्षमता असते, त्यात दोन्ही न्यूरॉन्स एकावेळी कार्यरत होतात. या प्रणालीत आपण दीर्घकाळ स्मृतीत राहील अशा पद्धतीने भाषा शिकत असतो. न्यूरल गेटिंग ही अशी प्रणाली आहे जी बायस्टेबल न्यूरॉन्सवर आधारित असते व त्यातही न्यूरॉन्स चालू-बंद होतात व इतर न्यूरॉन्सकडून आलेल्या संदेशाचे नियंत्रण केले जाते. बायस्टेबल न्यूरॉन चालू असेल तर मेंदूच्या एका भागातून दुसऱ्या भागात संदेश जातो. या प्रारूपात सिनॅप्टिक प्लास्टिसिटीमुळे ते कृत्रिम जाळेही भाषा शिकते पण त्याचे नियंत्रण न्यूरल गेटस चालू-बंद पद्धतीने काम करीत असतात. या प्रारूपात एकूण १५०० वाक्ये हे जाळे आत्मसात करू शकले व त्यात भाषा विकास मेंदूमार्फत कसा होतो हे दिसून आले. एकूण ५०० वाक्यातील नामे, क्रियापदे, क्रियाविशेषणे व इतर शब्द प्रकार त्याला समजले. त्यातून मानवी मेंदूत भाषेवर संस्करण कसे होते व तो भाषा कशी शिकतो यावर प्रकाश पडला आहे. ‘प्लॉस वन’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

First Published on November 17, 2015 2:25 am

Web Title: artificial neurons learn human language by communicating with scientists
टॅग Brain