उत्तर प्रदेशातील करोना विषाणूच्या घटत्या रुग्णसंख्येबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मॉडेलचे केवळ देशातच नव्हे तर परदेशातही कौतुक होत आहे. ऑस्ट्रेलियन खासदार क्रेग केली उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यावर इतके प्रभावित झाले आहेत की त्यांनी योगींना कर्जाच्या स्वरुपात मागितले आहे. उत्तर प्रदेशातील करोनाची दुसरी लाट नियंत्रित करण्यासाठी इव्हरमेक्टिनच्या वापराबद्दल क्रेग केली यांनी मुख्यमंत्री योगीचे कौतुक केले. आम्हाला कळवा की करोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांमध्ये कमी करण्यासाठी इव्हर्मेक्टिन हे औषध वापरले जाते.
“भारतातील उत्तर प्रदेश राज्य. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना येथे आणण्यासाठी काही मार्ग आहे का? जेणेकरून इथली इव्हर्मेक्टिनची समस्या संपेल,” असे ट्विट क्रेग यांनी केले आहे. क्रेग यांचे हे ट्विट खूपच चर्चेत असून १० जुलैपासून हे जवळपास साडेतीन हजार वेळा रीट्वीट झाले आहे.
The Indian state of Uttar Pradesh
Any chance they could loan us their Chief Minister Yogi Adityanath to release the Ivermectin sort out the mess our hopelessly incompetent State Premiers have created
https://t.co/H6xUwUe8GU— Craig Kelly MP (@CraigKellyMP) July 10, 2021
क्रेग केली यांनी एका ट्विटला उत्तर म्हणून हे ट्विट केले आहे त्या ट्विटमध्ये असे सांगितले गेले होते की, भारतातील १७ टक्के लोक उत्तर प्रदेशमध्ये राहतात. गेल्या ३० दिवसात, करोनामुळे होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी केवळ २.५ टक्के मृत्यू उत्तर प्रदेशात झाला आणि १ टक्क्यांहून कमी संक्रमित येथे आढळले. तर भारतातील एकूण लोकसंख्येपैकी ९ टक्के लोक महाराष्ट्रात वास्तव्य करतात. महाराष्ट्रात करोनाचे १८ टक्के रुग्ण आढळले आणि ५० टक्के बाधितांचा मृत्यू झाला.
योगी आम्हाला द्या.. उत्तर प्रदेशातील कोविड व्यवस्थापनचे ऑस्ट्रेलियाच्या खासदाराकडून कौतुक https://t.co/A2oJV7GFrT < येथे वाचा सविस्तर वृत्त #CoronaVirus #CoronavirusIndia #UttarPradesh #YogiAdityanath #Australia #CraigKelly @myogiadityanath @CraigKellyMP pic.twitter.com/yJxOhGlrJP
— LoksattaLive (@LoksattaLive) July 12, 2021
उत्तर प्रदेश सरकारच्या मते, राज्यात गेल्या २४ तासांत करोनाचे १२५ नवीन बाधित समोर आले आहेत. त्याच वेळी १३४ लोकांनी करोनावर मात केली आहे. आता उत्तर प्रदेशात कोरोनावर उपचार घेणाऱ्या रूग्णांची संख्या १ हजार ५९४ वर आली आहे आणि रुग्ण बरे होण्याचा दर ९८.६ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.