भारतासोबतच आख्खं जग करोनाशी लढा देत असताना जगभरात आलेल्या वेगवेगळ्या लसींमुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, तरीदेखील करोनाची वाढती रुग्णसंख्या आणि त्यासोबतच मृतांचा वाढणारा आकडा या बाबी सर्वच सरकारांसाठी चिंतेची बाब ठरल्या आहेत. या भीषण अशा करोनावर गोमूत्र हाच पर्याय ठरू शकतो, असा दावा भाजपा आमदाराकडून करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशच्या बैरिया विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे आमदार सुरेंद्रसिंह यांनी हा दावा केला असून “फक्त आणि फक्त गोमूत्र प्यायल्यानेच करोनाला हरवता येणं शक्य आहे”, असं ते म्हणाले आहेत. काही दिवसांपूर्वीच भाजपाचे बुलंदशहरमधील अजून एक आमदार देवेंद्र सिंह लोधी यांनी देखील अशाच प्रकारचा दावा केला होता. त्यामुळे या मुद्द्यावरून आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सुरेंद्रसिंह यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामध्ये त्यांनी हा दावा केला आहे.

 

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
sangli lok sabha, BJP, Miraj Pattern,
भाजपच्या ‘मिरज पॅटर्न’चा फज्जा
Solapur, Son-in-law cuts mother-in-law finger,
सोलापूर : शिळे जेवण दिल्याच्या कारणावरून जावयाने वृद्ध सासूचे बोट छाटले
A layer of Water Hyacinth due to pollution in the river saved the life of a young woman who committed suicide
तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप

काय आहे व्हिडिओमध्ये?

हा व्हिडिओ सुरेंद्रसिंह यांनी स्वत:च तयार केल्याचं व्हिडिओवरून दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सुरेंद्रसिंह स्वत: गोमूत्र पिताना दिसत आहेत. तसेच, गोमूत्र कसे प्यायले पाहिजे हे सांगतानाच त्यांनी “फक्त आणि फक्त गोमूत्रच करोनाला नियंत्रणात आणू शकेल”, असा दावा केला आहे. फक्त करोनाच नाही, तर इतरही अनेक आजारांवर गोमूत्र गुणकारी असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

भाजपाचे बुलंदशहरचे आमदार देवंद्रसिंह लोधी यांनी देखील असाच दावा केला होता “गोमूत्र प्यायल्याने कॅन्सर आणि करोनासारखे आजार होणार नाहीत. गोमूत्र प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते”, असं त्यांचं म्हणणं आहे. यासंदर्भातला व्हिडिओ व्हायरल होऊ लागल्यानंतर काँग्रेसचे नेते राजीव शुक्ला यांनी हा व्हिडिओ ट्वीट करून त्यावर टीका केली आहे.

 

वाचा बुलंदशहरचे आमदार देवेंद्रसिंह लोधी काय म्हणाले होते!

“हे सर्व अद्यापही सुरु आहे. कुणीतरी यांना शांत राहण्यास सांगितलं पाहिजे. अशा वक्तव्यांमुळे लोकांमधील रोष वाढतो. भाजपा आमदारांना अशा वक्तव्यांची सवय झाली आहे. कोणीही गोमूत्राच्या विरोधात नाही. पण डॉक्टर असल्याप्रमाणे करोनावरील इलाज सांगून गोमातेला यामध्ये आणू नये,” असं राजीव शुक्ला म्हणाले होते. आता पुन्हा भाजपाच्या एका आमदाराने तशाच प्रकारचा दावा केल्यामुळे हा मुद्दा चर्चेत आला आहे.