छत्तीसगढमधील नक्षलग्रस्त भागात चकमकीदरम्यान एका नक्षलवाद्याचा मृतदेह आढळून आला आहे. पोलिसांची स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) आणि नक्षलवाद्यांमध्ये धामतारी जिल्ह्यातील कट्टी जंगल परिसरात चकमक सुरू आहे.

या नक्षलवाद्याच्या मृतदेहाबरोबर त्याच ठिकाणावरून एक आयएएसएएस रायफल देखील हस्तगत करण्यात आली आहे. जवानांची परिसरात शोध मोहीम सुरू आहे.