News Flash

येडियुरप्पांनी घेतली शिवाकुमार यांची भेट, कर्नाटकात सत्ता बदलाच्या चर्चांना उधाण

बी.एस.येडियुरप्पा यांनी बुधवारी अचानक काँग्रेसचे संकटमोचक डी. शिवाकुमार यांची भेट घेतल्यामुळे कर्नाटकात पुन्हा एकदा तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

येडियुरप्पांनी घेतली शिवाकुमार यांची भेट, कर्नाटकात सत्ता बदलाच्या चर्चांना उधाण

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते बी.एस.येडियुरप्पा यांनी बुधवारी अचानक काँग्रेसचे संकटमोचक डी. शिवाकुमार यांची भेट घेतल्यामुळे कर्नाटकात पुन्हा एकदा तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. शिवाकुमार भाजपामध्ये प्रवेश करणार ? कर्नाटकात सत्ता बदल होणार का ? अशा विविध शक्यता वर्तवल्या जात आहेत. येडियुरप्पा यांचा मुलगा बी.वाय.राघवेंद्रही या भेटीच्यावेळी त्यांच्यासोबत होता.

शिवाकुमार यांच्या निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. सूत्रांच्या माहितीनुसार ही भेट राजकीय सत्ता समीकरणांसंदर्भात नव्हती तर शिवामोगामध्ये प्रलंबित असलेले सिंचन प्रकल्प वेगाने मार्गी लावण्यासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. बी.वाय.राघवेंद्र शिवामोगामधून खासदार आहे तर डी.के.शिवाकुमार कर्नाटक सरकारमध्ये जलसिंचन मंत्री आहेत.

दोन्ही नेत्यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी ही राजकीय भेट असल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शिवामोगामधील सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यासंदर्भात चर्चा झाली. मतदारसंघातील प्रलंबित असलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली असे येडियुरप्पा यांनी या बैठकीनंतर सांगितले.

सिंचन प्रकल्पासाठी आपण दोन हजार कोटी रुपयांची मागणी केली आणि आपल्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असे राघवेंद्र यांनी सांगितले. वन खाते, सिंचन खात्याच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दोन्ही नेत्यांमध्ये बोलणे झाले. त्यामुळे राजकीय चर्चेचा प्रश्नच येत नाही असे राघवेंद्र म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2018 3:11 pm

Web Title: bs yeddyurappa meet dk shivakumar at his home speculation rise in karnataka
Next Stories
1 हे ऐकलंत का?; साडी-धोतरात बांधल्यानं नोटा होतात खराब: सरकारी अधिकारी
2 Video : हृदयद्रावक…वडिलांच्या डोळ्यांसमोर स्कूल बसने चिमुकल्याला चिरडलं
3 धक्कादायक! वर्दळीच्या रस्त्यावर सर्वांसमक्ष सुऱ्याने भोसकून हत्या
Just Now!
X