30 May 2020

News Flash

CCTV Video: लँडिंगच्या काही सेकंद आधीच विमान इमारतींवर कोसळले

पाकिस्तानमधील विमान अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज

पाकिस्तानमधील कराची विमानतळाजवळ लँडिंगच्या वेळी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या (पीआयए) विमानाचा शक्रुवारी भिषण अपघात झाला. ९९ प्रवासी आणि आठ कर्मचारी असलेले विमान कराचीतील जिना आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील दाट लोकवस्ती असलेल्या निवासी परिसरात कोसळून अनेक प्रवासी ठार झाले आहेत. शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत ८२ जणांचे मृतदेह सापडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या अपघातामधून दोन प्रवासी वाचले असून अन्य सर्व ९७ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. असं असतानाच आता या विमान अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.

लाहोरहून उड्डाण केलेले पीके-८३०३ हे विमान कराचीला उतरण्यासाठी अवघ्या एका मिनिटाचा कालावधी राहिलेला असतानाच मलीर येथील मॉडेल कॉलनीजवळच्या जिना गार्डन परिसरात कोसळले. याच परिसरातील एका इमारतीवरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये विमान कोसळतानाचे दृष्य कैद झाले आहे. अनेकांनी सोशल मिडियावर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हायरल झालेल्या या सीसीटीव्ही फुटेजमध्ये विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट होताना स्पष्टपणे दिसत आहे.

या अपघातामुळे परिसरातील घरांचे नुकसान होऊन तेथील अनेक जण जखमी झाले आहेत. दुर्घटनाग्रस्त विमान रडारवरून अदृश्य होण्यापूर्वी वैमानिकाने हवाई वाहतूक नियंत्रण मनोऱ्याशी संपर्क साधून विमान उतरविण्यासाठी असलेल्या गिअरमध्ये समस्या असल्याची माहिती दिली होती. विमानाच्या अवशेषांखाली अडकलेल्यांना काढण्याचे काम सुरू आहे.  पाकिस्तानचे अध्यक्ष आरिफ अल्वी आणि पंतप्रधान इम्रान खान यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. इम्रान खान यांनी या घटनेच्या चौकशीचेही आदेश दिले आहेत.

लॉकडाउननंतर पाकिस्तानने देशांतर्गत विमान सेवा सुरु केल्यानंतर अवघ्या आठवड्याभरात हा अपघात झाला. यापूर्वी ७ डिसेंबर २०१६ रोजी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या एआरटी-४२ या विमानाचा चित्रल ते इस्लामाबाद या उड्डाणादरम्यान अपघात झाला होता. या अपघातामध्ये ४८ जणांना प्राण गमावावे लागले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2020 8:21 am

Web Title: cctv video shows pia plane crashing into karachi building scsg 91
Next Stories
1 करोना संकटकाळातही चीननं केली डिफेन्स बजेटमध्ये वाढ
2 चोवीस तासांत सहा हजार नवे रुग्ण
3 पश्चिम बंगालला आणि ओडिशाला अंतरिम साहाय्य
Just Now!
X