News Flash

डॉक्टरांवर हल्ले झाल्यास कठोर कारवाईचे केंद्राचे राज्यांना आदेश

हल्लेखोरांविरुद्ध एफआयआर नोंदवून  खटले शीघ्रगती न्यायालयाकडे वर्ग केले पाहिजेत.

नवी दिल्ली : डॉक्टर आणि आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे नोंदवावे आणि त्यांच्यावर साथरोग विकार (सुधारणा) कायदा २०२० नुसार कडक कारवाई करावी, असा आदेश केंद्र सरकारने शनिवारी राज्य सरकारांना दिला आहे.

करोना साथरोगाच्या काळात देशातील अनेक भागांमध्ये डॉक्टर आणि आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर हल्ले करण्याच्या घटना घडल्या त्याची दखल घेऊन केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना याबाबत पत्र लिहिले आहे.

डॉक्टर अथवा आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना धमक्या देण्यात आल्या अथवा त्यांच्यावर हल्ला करण्यात आला तर त्यामुळे त्यांच्या नीतिधैर्याचे खच्चीकरण होते आणि त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण होते.  त्याचा आरोग्य यंत्रणेवरही विपरीत परिणाम होतो, असे भल्ला यांनी   पत्रामध्ये म्हटले आहे. हल्लेखोरांविरुद्ध एफआयआर नोंदवून  खटले शीघ्रगती न्यायालयाकडे वर्ग केले पाहिजेत. जेथे आवश्यक असेल तेथे साथरोग विकार (सुधारणा) कायदा २०२० नुसार कारवाई करावी, असा आदेशही देण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2021 12:01 am

Web Title: center government states to take stern action in case of attacks on doctors akp 94
Next Stories
1 इराणच्या अध्यक्षीय निवडणुकीत रइसी यांचा विजय
2 भारतीय लष्करी अधिकारी समजून पाकच्या ISI ने केला हनी ट्रॅपमध्ये फसवण्याचा प्रयत्न; मात्र ती व्यक्ती निघाली….
3 कोव्हिशिल्ड लस घेतलेल्या महिलेला ५ मिनिटांत दिली कोव्हॅक्सिन लस; अधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेश
Just Now!
X