पाकिस्तानसोबतचे सैनिक डावपेचविषयक संबंध बळकट करण्यासाठी त्या देशाशी दहशतवादविरोध, सागरी सुरक्षा आणि लष्करी तंत्रज्ञान या क्षेत्रांमधील सहकार्य वाढवण्याचा संकल्प चीनने व्यक्त केला आहे.
पाकिस्तानचे नौदल प्रमुख मोहम्मद झकाउल्ला यांच्यासोबत बीजिंगमध्ये झालेल्या बैठकीत चीनच्या सेंट्रल मिलिटरी कमिशनचे उपाध्यक्ष जनरल फान चँगलाँग यांनी हा ‘संकल्प’ केल्याचे वृत्त झिन्हुआ या सरकारी वृत्तसंस्थेने दिले.
क्षेत्रीय सुरक्षाविषयक व्यवहारांबाबत पाकिस्तानसोबतचा समन्वय आणि सहकार्य वाढवण्याचा चीनला विश्वास आहे. चीनच्या ‘बेल्ट अ‍ॅण्ड रोड’ उपक्रमाच्या चौकटीत चीन- पाकिस्तान हा आर्थिक मार्ग (इकॉनॉमिक कॉरिडॉर) बांधण्यासाठी चीन पाकिस्तानसोबत काम करेल, असे फान म्हणाले.
तर दोन्ही देशांच्या सैन्यामधील, विशेषत: नौदलातील वास्तववादी सहकार्य वाढवण्यासाठी आणि त्यांचे सहकार्य नव्या उंचीवर नेण्याकरिता पाकिस्तान चीनसोबत काम करेल, असे झकाउल्ला या वेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले.