News Flash

“पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिमेला जर कुणापासून धोका असेल, तर तो भक्तांपासूनच”

काँग्रेसचं भाजपा समर्थकांना उत्तर

“पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिमेला जर कुणापासून धोका असेल, तर तो भक्तांपासूनच”
पंतप्रधान नरेंद्र मोदी. (संग्रहित छायाचित्र)

पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेल्या दोन्ही देशातील लष्करी संघर्षाचे पडसाद अजूनही देशात उमटत आहे. गलवान खोऱ्यात १५ जून रोजी झालेल्या संघर्षासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी व पंतप्रधान कार्यालयानं वेगवेगळी विधान केल्यानं विरोधक आणखी आक्रमक झाले आहेत. त्यावरून राहुल गांधी यांनी मोदींवर शरसंधान करताना सरेंडर मोदी अशी टीका केली होती. या टीकेवरून काहीजणांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. त्याला काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीत चिनी सैन्यानं भारतीय भूभागात घुसखोरी केली नसल्याचा, तसेच कोणतीही चौकी अथवा जवान ताब्यात घेतले नसल्याचा दावा केला होता. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाकडून वेगळा खुलासा करण्यात आला. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांच्या विधानाचा चिनी माध्यमांनीही गैरफायदा घेतल्याचं दिसून आलं. या सगळ्या घटनांक्रमात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नरेंद्र मोदी नव्हे सरेंडर मोदी, अशी टीका केली होती. त्यावरून भाजपा समर्थकांनी राहुल गांधींवर टीका केली.

भाजपा समर्थकांकडून करण्यात आलेल्या टीकेला काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांनी उत्तर दिलं आहे. “मोदीजींच्या प्रतिमेला जर कुणाकडून धोका असेल, तर तो भक्तांपासूनच आहे. कोणत्याही भक्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव दुरूस्त करण्याचा प्रयत्न केला नाही. आता सगळे सलेंडरची योग्य स्पेलिंग सांगण्यासाठी मैदान आले आहेत,” अशी टीका काँग्रेसनं केली आहे.

चीन सीमेवर पूर्व लडाखमध्ये झालेल्या संघर्षानंतर राहुल गांधी यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्यानं टीका केली जात आहे. आता राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांचे नाव बदलून नरेंद्र मोदी हे तर खरे ‘सरेंडर मोदी’ असल्याची टीका टि्वटरवरून केली होती. त्यांच्या या टीकेनंतर काँग्रेस विरुद्ध भाजपा असा शाब्दिक वॉर सुरू झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2020 6:40 pm

Web Title: congress criticised bjp supporter over pm narendra modi image bmh 90
Next Stories
1 जगन्नाथ रथयात्रा थांबण्यासाठी सुनियोजित कट, स्वामी निश्चलानंद सरस्वती यांचा गंभीर आरोप
2 काँग्रेसच्या काळात झालेल्या छळांमुळे नजर कमी झाली, मेंदूवर सूज आली -साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर
3 “लष्करावर अविश्वास दाखवू नका म्हणण्यापेक्षा सत्य सांगा”, कमल हासन यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
Just Now!
X