गाड्यांची चोरी करणाऱ्या देशभरात पसरलेल्या टोळीशी कथित संबंध असल्याप्रकरणी पोलिसांनी काँग्रेसच्या आमदार रुमी नाथला ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिसांनी जाकीर आणि रुमीचा अंगरक्षक वेदव्रत बरपत्रा गोहैनलादेखील ताब्यात घेतले. गाड्या चोरणाऱ्या या कथित टोळीचा प्रमुख अनिल चौहानला रुमीच्या शिफरशीवरून असाम विधानसभाचे गाड्यांसाठीचे परवाने देण्यात आल्याचे पोलिसांनी या दोघांकडे केलेल्या चौकशीदरम्यान उघड झाले असून, चौहानला गुवाहाटी पोलिसांनी ताब्यात घेतले. दिल्ली, मुंबई आणि अन्य राज्यातील अशाच प्रकारच्या अनेक घटनांसाठी पोलीस त्याच्या मागावर होते.
गाड्यांची चोरी करणाऱ्यास गाड्यांसाठीचे परवाने देण्याची शिफारस केल्याप्रकरणी आसाम विधानसभा सचिवालयाने रुमीला एका नोटीस जारी करून याबाबत विचारणा केली आहे. काँग्रेसची कार्यकर्ता असलेल्या चौहानच्या पत्नीने गाड्यांच्या परवान्यांसाठीच्या अर्जावर स्वाक्षरी केली असल्याचे रुमीने आपल्या उत्तरात म्हटले आहे. माझा चौहानबरोबर कोणताही संबंध नाही, परंतु काँग्रेसची कार्यकर्ता असलेल्या त्याच्या पत्नीला मी ओळखते. मला बदनाम करण्याचे हे एक षडयंत्र आहे. आपला न्यायव्यवस्थेवर विश्वास असून, या प्रकरणी कायम पोलिसांना सहाय्य करणार असल्याचे रुमी म्हणाली. आसाम काँग्रेसचे अध्यक्ष अंजन दत्ता यांनीदेखील गाड्या चोरणाऱ्या कुविख्यात टोळीशी संबंध असल्याप्रकरणी रुमीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
वादाच्या भोवऱ्यात अडकलेलेल्या आमदार रुमीने आपल्या पहिल्या पतीशी घटस्फोट न घेता २०१२ मध्ये इस्लाम धर्म स्वीकारून जाकीरशी विवाह केला होता. या दोघांवर जुलै २०१२ मध्ये एका टोळक्याने हल्ला चढविला होता. गेल्या वर्षी वेगळे झालेले रुमी आणि जाकीर अद्याप वेगळेच राहातात.