25 May 2020

News Flash

हिमाचलमध्ये काँग्रेसची सरशी

प्रस्थापित सत्तेच्या विरोधातील लाटेवर स्वार होत आणि ज्येष्ठ नेते वीरभद्रसिंह यांच्यावर करण्यात आलेले भ्रष्टाचाराचे आरोप निष्फळ ठरवत काँग्रेसने गुरुवारी हिमाचल प्रदेशात भारतीय जनता पक्षाकडून सत्ता

| December 21, 2012 06:46 am

प्रस्थापित सत्तेच्या विरोधातील लाटेवर स्वार होत आणि ज्येष्ठ नेते वीरभद्रसिंह यांच्यावर करण्यात आलेले भ्रष्टाचाराचे आरोप निष्फळ ठरवत काँग्रेसने गुरुवारी हिमाचल प्रदेशात भारतीय जनता पक्षाकडून सत्ता हिसकावून घेतली. ६८ सदस्यांच्या विधानसभेत या पक्षाला ३६ जागांवरील विजयामुळे काठावरचे बहुमत मिळाले. गेल्या निवडणुकीत या पक्षाला २३ जागा मिळाल्या होत्या.
सत्तेवर असलेल्या पक्षाला नाकारण्याची परंपरा राज्याने या निवडणुकीतही पाळली. सत्ताधारी भाजपला अंतर्गत भांडणे आणि बंडखोरी यांचा फटका बसला. भाजपला अवघ्या २६ जागांवर समाधान मानावे लागले. गेल्या निवडणुकीत या पक्षाला ४१ जागांवर विजय मिळाला होता.  बंडखोरी करून अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले पाच उमेदवार यशस्वी ठरले.       

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2012 6:46 am

Web Title: congress outweighed in himachal
Next Stories
1 मोदीच गुजरातचे नरेंद्र!
2 भाईयों और बहनों..
3 वडानगर ते दिल्ली..
Just Now!
X