ज्येष्ठ नेते ज्योतिरादित्य शिंदे यांची भावना

मध्य प्रदेशात काँग्रेस गेली १५ वर्षे सत्तेबाहेर आहे. त्यामुळे यावेळी सत्ता आणण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न चालविले आहेत. पक्षासाठी आता नाही तर कधीच नाही अशीच स्थिती असल्याची भावना खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

४७ वर्षीय ज्योतिरादित्य हे गुणा-शिवपुरीचे खासदार असून, गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे इतर उमेदवार पराभूत होत असताना ज्योतिरादित्य यांना मात्र जागा राखण्यात यश मिळाले होते. तुम्ही मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहात काय असे विचारता, पक्षाच्या निर्णयाला बांधील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जनतेची सेवा करणे हेच माझे ध्येय आहे. काँग्रेसची राज्यात सत्ता येणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. काही सर्वेक्षण कल काँग्रेसच्या बाजूने असले तरी प्रचार संपेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. आम्हाला भाजपची रणनीती माहिती आहे, त्यामुळे पोटनिवडणुकीत आम्ही त्यांना पराभूत केले होते. भाजप पैसे व गुंडगिरीचा वापर करत असल्याचा आरोप शिंदे यांनी केला.