करोनाचे विषाणू हवेतून पसरत असल्याचे अजून तरी आढळलेले नसल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेचे (आयसीएमआर) डॉ. रमण गंगाखेडकर यांनी रविवारी स्पष्ट केले.

करोना रुग्णाच्या खोकला वा शिंक यांच्याद्वारे उडणाऱ्या थेंबाच्या संपर्कात आल्यास विषाणूची बाधा होते. हा विषाणू हवेतून पसरत असता तर कुटुंबातील प्रत्येकाला करोना झाला असता, रुग्णालयातील अन्य रुग्णांनाही तो झाला असता, असे डॉ. गंगाखेडकर म्हणाले. काही परदेशी संशोधकांनी करोना हवेतून पसरण्याचा धोका असल्याचे मत व्यक्त केले होते. मात्र, तशी शक्यता असल्याचे दिसलेले नाही, असे डॉ. गंगाखेडकर यांनी सांगितले.

करोना चाचण्यांची व्याप्ती वाढवण्यासाठी ‘आयसीएमआर’ने जलद चाचणींना परवानगी दिली असली तरी साधनसामग्री (किट्स) बुधवापर्यंत मिळणार आहेत.