News Flash

Corona Vaccine: लसींचा अपव्यय टाळण्यासाठी काय करावं?; केंद्राने राज्यांना सुचवला उपाय

करोना लसींचा अपव्यय १ टक्क्यांपर्यंत कमी करण्याची केंद्राची सूचना

झारखंडमध्ये आतापर्यंत ३३.९५ टक्के लसी वाया गेल्या आहे.

देशामध्ये करोना लसींचा तुटवडा जाणवत असतानाच अनेकदा लसी वाया गेल्याची माहिती अनेकदा समोर आली आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये पुरवठा करण्यात आलेल्या अनेक लसी न वापरताच वाया गेल्या आहेत. देशभरामध्ये वाया गेलेल्या लसींची संख्या लाखांच्या घरांमध्ये आहे. अनेकदा लसी न वापरताच फेकून देण्यात आल्यात. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ८ जून रोजी लसीकरणासंदर्भातील नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार एखाद्या राज्यात अधिक लस वाया गेली असेल तर पुढील दिवसांत कमी लसी देण्यात येणार आहेत.

कमीत कमी लस वाया जाण्यावर भर देण्यात यावा

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी लसींचा अपव्यय टाळण्यासाठी माहिती दिली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात करोना लसीचा अपव्यय एक टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्याचे लक्ष्य आवाहन केले आहे. लसीकरण अशा प्रकारे आयोजित करण्यात यायला हवं की कमीत कमी लस वाया जाईल आणि बहुतेक राज्यांनी हे अमलात देखील आणलं आहे. यामध्ये लस देणाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. लस दिल्यानंतर त्या कुप्या उघड्याच ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे लस देणाऱ्यांनी हे लक्षात ठेवायला हवं की लसीच्या कुप्या उघडल्या नंतर चार तासांमध्ये त्याचा वापर करण्यात यावा असे या निवेदनात म्हटले आहे.

समजून घ्या : लसी वाया जातात म्हणजे नेमकं काय होतं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसींच्या अपव्यय टाळण्यावर भर दिला आहे. शुक्रवारी देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये सर्वात कमी लस वाया गेल्या आहेत. तर झारखंडमध्ये सर्वात जास्त म्हणजे ३३.९५ टक्के लसी वाया गेल्या आहे. छत्तीसगड आणि मध्यप्रदेशात लसींच्या वाया जाण्याचा दर हा अनुक्रमे १५.७९ आणि ७.३५ टक्के आहे. झारखंडने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.

Corona Vaccination : राज्यांना केंद्र सरकारचा इशारा, लस वाया घालवली तर..

राज्यांना आतापर्यंत २५.६० कोटीपेक्षा अधिक लसींचा पुरवठा

पहिल्या सत्रात कमीत कमी १०० लोकांचे लसीकरण केल्यास कमी लस वाया जातील असे केंद्राने म्हटले आहे. कमी लोकसंख्या असलेल्या क्षेत्रात हा नियम लागू होणार नाही असे त्यांनी म्हटले. आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की केंद्र सरकारने आतापर्यंत २५,६०,०८,०८० लस विनामूल्य व थेट राज्यांना खरेदीच्या माध्यमातून राज्यांना पुरविल्या आहेत. यापैकी २४,४४,०६,०९६ लसींचा वापर करण्यात आला असून त्यामध्ये वाया गेलेल्या लसीदेखील आहेत. राज्यांकडे अद्याप १,१७,५६,९११ कोविड लस उपलब्ध आहेत. त्याशिवाय ३८,२१,१७० लसी पुढील तीन दिवसांत त्या राज्यांना देण्यात येतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2021 7:39 pm

Web Title: corona vaccine ministry of health tells states to prevent wastage of vaccines abn 97
टॅग : Corona,Coronavirus
Next Stories
1 सरन्यायाधीश एनव्ही रामणा तिरुपती मंदिरात नतमस्तक
2 भारत-बांगलादेश सीमेवर चीनी गुप्तहेराला अटक; BSF ची कारवाई
3 भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला अमेरिकेत परवानगी नाही; भारताला मोठा धक्का
Just Now!
X