करोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला उद्देशून भाषण केले. त्यांच्या भाषणातील दहा प्रमुख मुद्दे जाणून घ्या.

– प्रत्येक भारतीयाने सर्तक असले पाहिजे. गरज असेल तरच बाहेर पडा, अन्यथा घराबाहेर जाणे टाळा.

– वयाच्या साठी ओलांडलेल्यांनी घरातच रहावे.

– २२ मार्चला रविवारी सकाळी सात ते रात्री नऊपर्यंत घराबाहेर पडू नका. जनता कर्फ्यू पाळा.

– हॉस्पिटल, विमानतळावर आज लाखो लोक सेवा बजावत आहेत. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता हे काम ते करत आहेत. त्यांना करोनाची बाधा होण्याची जास्त शक्यता असूनही ते हे काम करत आहेत. व्हायरस आणि देश यामध्ये ते आपले रक्षणकर्ते आहेत अशा लोकांप्रती कृतज्ञता म्हणून २२ मार्च रोजी संध्याकाळी पाच वाजता लोकांनी दरवाजे उघडून, खिडकीमध्ये उभे राहून त्या सर्वांचे घंटी, थाळी आणि टाळया वाजवून कृतज्ञतेची भावना व्यक्त करावी असे मोदी म्हणाले.

– नेहमीच्या चेकअपसाठी रुग्णालयात जाणे टाळा. शस्त्रक्रिया पुढे ढकलणे शक्यत असेल तर तसे करा.

– अर्थमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली COVID-19 हा अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी इकोनॉमिक टास्क फोर्स बनवण्यात आला आहे. करोना व्हायरसमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे.

– तुमच्या घरी काम करणारा आला नाही म्हणून त्यांचे वेतन कापू नका, तुमचे कर्मचारी, ड्रायव्हर यांना मदत करा.

– साठेबाजी करु नका, जीवनावश्यक वस्तुंची कमतरता निर्माण होणार नाही.

– तु्म्हाला असे वाटते की, तुम्हाला काही होणार नाही. तुम्ही बाहेर फिरत राहणार तर तुमची विचार करण्याची पद्धत चुकीची आहे. तुम्ही स्वत:ला आणि तुमच्या प्रियजनांना संकटात टाकत आहात. तुम्ही गर्दी टाळली पाहिजे. आवश्यकता असेल तरच बाहेर पडा.

– भारतावर करोना व्हायरसच्या संकटाचा प्रभाव पडणार नाही असे मानणे चुकीचे आहे. १३० कोटी देशवासियांना संयम आणि संकल्प अधिक दृढ करण्याची गरज आहे. करोनाला रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशाने पालन केले पाहिजे. या साथीच्या आजारात मी स्वस्थ तर जग स्वस्थ हा मंत्र उपयोगाला येतो.