News Flash

आशा वर्कर, डॉक्टर, कर्मचाऱ्यांना ५० लाखांचं विमा संरक्षण

अर्थमंत्र्यांची घोषणा

आशा वर्कर, डॉक्टक कर्मचाऱ्यांना ५० लाखांचं विमा संरक्षण देण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेत निधीची तरतूद केल्याचं त्या म्हणाल्या. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

स्वास्थ्य विभागाचे कर्मचारी, आशा वर्कर, डॉक्टर, स्वच्छता कर्मचारी हे आज एखाद्या योध्याप्रमाणे देशाची सेवा करत आहेत. त्यांच्यासाठी प्रती व्यक्ती ५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. याअंतर्गत २० लाख कर्मचाऱ्यांचा समावेश होईल. देशातील कामगार, गरीबांना आज मोठी मदतीची मोठी आवश्यकता आहे. ज्यांच हातावर पोट आहे. त्यांचे हाल होत आहेत, असंही त्या म्हणाल्या.

आणखी वाचा- गरिबांना तीन महिने गहू, तांदूळ, डाळीचे मोफत वाटप होणार – सीतारामन

१ लाख ७० हजार कोटींचे पॅकेज
देशातील गोरगरीबांसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत १ लाख ७० हजार कोटींचे पॅकेज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं आहे. करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेला लॉकडाउनचा निर्णय योग्यच आहे. मात्र या कालावधीत हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होत आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी या पॅकेजची घोषणा करण्यात आली असल्याचे त्या म्हणाल्या.

आणखी वाचा- Coronavirus : गोरगरीबांसाठी १ लाख ७० हजार कोटींचे पॅकेज, निर्मला सीतारामन यांची घोषणा

उपाशी राहणार नाही याची काळजी घेणार
देशात कोणीही उपाशी राहणार नाही याची काळजी आम्ही सरकार म्हणून घेत आहोत असंही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं. गरीबांना पाच किलो गहू किंवा तांदूळ १ किलो डाळ मोफत मिळणार आहे. पुढील तीन महिन्यांसाठी ही योजना असणार आहे. अशी माहितीही सीतारामन यांनी दिली. एकही गरीब माणूस उपाशी झोपणार नाही याची काळजी आम्ही सराकर म्हणून घेणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. देशातील ८० कोटी लोकांना या योजनेचा लाभ घेता येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2020 1:45 pm

Web Title: coronavirus finance minister nirmala sitharaman anurag thakur declares 50 lakh insurance to doctors asha workers jud 87
Next Stories
1 गरिबांना तीन महिने गहू, तांदूळ, डाळीचे मोफत वाटप होणार – सीतारामन
2 Coronavirus: दूध आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या व्यक्तीचा पोलीस मारहाणीत मृत्यू, पश्चिम बंगालमधील घटना
3 Coronavirus : गोरगरीबांसाठी १ लाख ७० हजार कोटींचे पॅकेज, निर्मला सीतारामन यांची घोषणा
Just Now!
X