चीनमधून जगभरामध्ये प्रादुर्भाव झालेल्या करोनाचा विषाणूचा संसर्ग १६ लाखांहून अधिक जणांना झाला आहे. तर या विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या एक लाखांहून अधिक झाली आहे. जगभरातील अनेक देशांमधील वैज्ञानिक करोनावरील औषध आणि लस शोधण्यासंदर्भातील संशोधन करत आहेत. मात्र आतापर्यंत कोणालाही यामध्ये यश आलेले नाही. करोनाचे रुग्ण बरे होतील अशा प्रकारची एकही लस अद्याप सापडलेली नाही. मात्र याच पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियातील एका महिला संशोधकाने करोनासंदर्भातील औषध सापडल्याचा दावा केला आहे.

या महिला संशोधकाने दिलेल्या माहितीनुसार उवा मारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधाच्या मदतीने केवळ ४८ तासामध्ये करोना झालेल्या रुग्णाला बरं करता येणं शक्य आहे. या औषधावर आणखीन संशोधन करण्याची गरज असल्याचेही या महिला संशोधकाने म्हटले आहे. करोना झालेल्या कोणत्याही रुग्णावर अद्याप या औषधाचा प्रयोग करण्यात आलेले नाही. या औषधाचे अनेक साईड इफेक्ट असल्याचेही सांगण्यात येत आहे.

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
cholesterol levels
‘हा’ एक ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने होईल कमी; फक्त सेवनाची पद्धत एकदा डाॅक्टरांकडून जाणून घ्या
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच
diy homemade natural chemical free floor cleaner recipe for a Healthier Home
फक्त २० रुपयांत घरच्या घरी तयार करा फ्लोअर क्लिनर; वापरताच आरश्यासारखी चमकेल फरशी

‘द सन’ या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमधील मोनाश बायोमेडिसिन डिस्कवरी इन्स्टिट्यूटच्या डॉ. कायली वागस्टाफ यांनी यासंदर्भात माहिती दिल्याचे म्हटले आहे. “आमच्या संशोधनामध्ये उवा मारण्यासाठीच्या औषधामधील इवरमेक्टिनचा (Ivermectin) एका डोसामध्ये २४ तासांमध्ये करोना विषाणूचा व्हायरल आरएनए नष्ट होण्यास सुरुवात होते असं दिसून आलं आहे. ४८ तासांमध्ये करोना विषाणूचा प्रभाव जवळवजळ पूर्णपणे नष्ट होऊ शकतो,” असं कायली म्हणाल्या आहेत.

मात्र हे औषध नक्की कसं काम करतं याबद्दलची संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेले नाही. तरी संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार या औषधामुळे कोरना विषाणूला मानवी शरीरातील पेशींवर म्हणजेच होस्ट सेलवर जम बसवणे कठीण जात असल्याचे दिसून आलं आहे. या औषधाची मानवावर अद्याप क्लिनिकल ट्रायल म्हणजेच प्रायोगिक चाचणी झालेली नाही. मात्र किती प्रमाणात हा डोस मानवी शरीरावर परिणामकारक ठरु शकतो याबद्दल संशोधन सुरु आहे.

“जगभरामध्ये करोनाने थैमान घातलं आहे. आपण यावर औषध किंवा उपचार पद्धती शोधत आहोत. अद्याप या संसर्गावर जगभरात मान्यता मिळालेलं एकही औषध सापडलं नाही. अशावेळेस आधीपासून उपलब्ध असणाऱ्या संयुंगांच्या माध्यमातून औषध निर्मिती करता आल्यास त्याने जगभरातील लोकांना तातडीची मदत मिळू शकते”, असं डॉक्टर कायली यांनी सांगितलं. जोपर्यंत करोनावर औषध उपलब्ध होत नाही तोपर्यंत सध्या जगभरात उपलब्ध असणाऱ्या औषधांच्या मदतीने आपण उपचार करुन शकतो असं कायली सांगतात.

इवरमेक्टिन आहे तरी काय?

इवरमेक्टिन हे एक अँण्टी-पॅरासाईड आहे. म्हणजेच विषाणूंपासून होणाऱ्या आजारांवरील औषधांमध्ये या रसायनाचा प्रयोग केला जातो. एचआयव्ही, डेंग्यू, झीका विषाणूवरील औषधांमध्ये याचा वापर केला जातो. या सर्व आजारांवर हे रसायन परिणामकारक ठरले आहे. डोक्यातील उवा मारण्यासाठी वापरण्यात येणारे तेल आणि मलमामध्ये इवरमेक्टिनचा वापर १९८० पासून होत आहे. काही त्वचारोगांवरील औषधांमध्येही या रसायनाचा वापर केला जातो.

इवरमेक्टिनचा लस म्हणून उपलब्ध होण्यास अनेक महिने लागू शकतात असंही वैज्ञानिकांनी स्पष्ट केलं आहे. या औषधापासून बनवलेल्या लसीचे प्रयोगशाळेतील चाचणी करण्यासाठी किमान महिन्याभराचा कालावधी लागू शकतो.

इवरमेक्टिन हे अत्यंत घातक रसायन

जगभरातील वेगवगेळ्या देशांमधील सरकारे नागरीकांनी कोणत्याही पद्धतीने स्वत:च डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नये अशापद्धतीचे आवाहने करत आहेत. इवरमेक्टिन हे रसायन औषधामध्ये वापरलं जातं. या रसायनाचे साईड इफेक्टमुळे थकवा, उलट्या, खास सुटणे, पोटदुखी असे परिणाम दिसून येऊ शकतात. सध्या या रसायनावर संशोधन सुरु आहे. या रसायनाचे साईड इफेक्ट पाहता त्यावर अद्यापही संशोधन सुरु आहे. किती प्रमाणात हे औषध देण्यात यावे हे निश्चित झाल्यानंतरच त्याचा मानवावर प्रयोग करण्यात येणार आहे.