करोनाने जगभरात थैमान घातला असताना आपल्याकडे प्रादुर्भाव होऊ नये यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. करोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकारने मोठं पाऊल उचललं असून २१ दिवसांसाठी लॉकडाउन जाहीर केलं आहे. दरम्यान करोनाविरोधातील भारताच्या लढ्यात एक मोठी घडामोड समोर आली असून भारतीय शास्त्रज्ञांनी करोना विषाणूची माइक्रोस्कोपिक चित्र जगासमोर आणलं आहे.

करोनाविरोधातील लढ्यात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश मिळालं आहे. ३० जून रोजी केरळमध्ये भारतातील करोना पहिला रुग्ण सापडला होता. भारतीय शास्त्रज्ञांनी या रुग्णाच्या घशाचा द्रव घेतला होता. त्यावरुन भारतीय शास्त्रज्ञांकडून संशोधन कऱण्यात आलं. दरम्यान करोना विषाणूंचं माइक्रोस्कोपिक चित्र शास्त्रज्ञांकडून जारी करण्यात आलं आहे.

यासंबंधीचा पूर्ण अभ्यास आणि माहिती इंडियन जनरल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये (IJMR) छापण्यात आली आहे.