25 February 2021

News Flash

‘सीरम’ला न्यायालयाकडून मोठा दिलासा; ‘कोविशिल्ड’ ब्रॅंड विरोधातील याचिका फेटाळली

कुटिस बायोटेकनं दाखल केली होती याचिका

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं तयार केलेल्या ‘कोविशिल्ड’ या करोना लसीच्या ट्रेडमार्कवरुन वाद निर्माण झाला असून या विरोधात दाखल याचिका पुण्याच्या सत्र न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे सीरमला दिलासा मिळाला असून कंपनीच्या लसीचे ‘कोविशिल्ड’ हे नाव कायम राहणार आहे. ‘कुटिस बायोटेक’ या कंपनीने सीरम विरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती.

कुटिस बायोटेकने ४ जानेवारी रोजी दाखल याचिकेत म्हटलं होतं की, कंपनीने सीरमच्या आधीच कोविशिल्ड या नावाचा वापर केला आहे. त्यामुळे आमच्याकडेचं हे नाव वापरण्याचा अधिकार आहे. यावर सीरमने आपली बाजू मांडताना कोर्टाला सांगितलं की, दोन्ही कंपन्या भिन्न उत्पादन श्रेणीमध्ये काम करतात, त्यामुळे ट्रेडमार्कवरुन भ्रम निर्माण होण्याचे कारण नाही. अॅड. हितेश जैन यांनी सीरमची बाजू कोर्टात मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने कुटिस बायोटेकची याचिका फेटाळून लावली. मात्र, या कंपनीने कोर्टाच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात अपील करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, भारतात या वर्षाच्या सुरुवातीला सीरमच्या ‘कोविशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लसींना आपत्कालिन लसीकरणासाठी परवानगी देण्यात आली आहे. यांपैकी ऑक्सफर्ड-अॅस्ट्राजेनेकाने संयुक्तपणे विकसित केलेल्या लसीचे ‘कोविशिल्ड’ नावाने सीरम इन्स्टिट्यूट जगभरात उत्पादन करत आहे. भारत सरकारने लसीकरण मोहिमही सुरु केली असून कोविशिल्डचे १ कोटी १० लाख डोस खरेदी केले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2021 3:35 pm

Web Title: court rejects cutis biotech plea against serum institute using covishield trademark aau 85
टॅग Coronavirus
Next Stories
1 ज्याने तिरंग्याचा अपमान केला त्याला पकडा; टिकैत यांचा पंतप्रधानांवर पलटवार
2 हुकूमशाही, बहुसंख्यांकवादानं लोकसभा निवडणुकीत बजावली महत्वाची भूमिका – हमीद अन्सारी
3 Fact Check : संबित पात्रा पडले तोंडघशी; केजरीवालांच्या ‘त्या’ व्हिडीओमागील सत्य आलं समोर
Just Now!
X