News Flash

“आमच्या हेतूंविषयी काही राज्य तक्रार करतात, हे वेदनादायी आहे!” – Bharat Biotech

Covaxin लस तयार करणाऱ्या भारत बायोटेकने दिल्ली सरकारच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे.

सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया अर्थात SII ने उत्पादित केलेली कोविशिल्ड आणि भारत बायोटेकनं तयार केलेली Covaxin या दोन लसींचे डोस सध्या भारतात दिले जात आहेत. त्यामध्ये मोठा हिस्सा कोविशिल्डचा असला, तरी कोवॅक्सिनही मोठ्या प्रमाणात दिल्या जात आहेत. मात्र, कोवॅक्सिनचा पुरवठा कमी होत असल्याची तक्रार काही राज्यांकडून करण्यात आली होती. त्यावर आता Bharat Biotech च्या सहायक व्यवस्थापकीय संचालिका सुचित्रा इल्ला यांनी ट्वीट करून कंपनीकडून नाराजी व्यक्त केली आहे. “हे फार वेदनादायी आहे”, असं त्या म्हणाल्या आहेत. नुकतीच दिल्ली सरकारने अशा प्रकारची तक्रार केली असून “केंद्र सरकारच्या सूचनांवरून कोवॅक्सिनचा पुरवठा केला जात नाही”, असा आरोप त्यांनी केला आहे.

काय म्हणाल्या सुचित्रा इल्ला?

सुचित्रा इल्ला यांनी ट्वीट करून भारत बायोटेक कंपनीचीच भूमिका स्पष्ट केली आहे. “१०/५/२१ रोजी कोवॅक्सिनचे डोस पाठवण्यात आले आहेत. जवळपास १८ राज्यांना हे डोस पाठवण्यात आले आहेत. पण काही राज्यांकडून आमच्या हेतूंविषयी शंका घेतल्या जात आहेत हे आमच्या टीमसाठी वेदनादायी आहे. आमच्या ५० कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्यामुळे ते सुट्टीवर आहेत. मात्र, तरीदेखील आम्ही या साथीच्या संकटामध्ये २४ तास आणि सातही दिवस तुमच्यासाठी काम करत आहोत”, असं सुचित्रा इल्ला आपल्या ट्वीटमध्ये म्हणाल्या आहेत.

 

उपमुख्यमंत्री मनिष सिसोदियांचा आरोप!

भारत बायोटेकने कोव्हॅक्सिन लसीचे डोस देण्यास नकार दिल्याचा दावा दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना मनिष सिसोदिया यांनी दिल्लीने कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्डचे प्रत्येकी ६७ लाख असे एकूण १ कोटी ३४ लसींचे डोस पुरवण्याची मागणी केली होती अशी माहिती दिली. मात्र भारत बायोटेकने लसींचे डोस पुरवण्यास आपण असमर्थ असल्याचं दिल्ली सरकारला कळवलं आहे. यावेळी त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार लसींचा पुरवठा केला जात असल्याचं कळवलं असल्याचं सिसोदिया म्हणाले आहेत.

“केंद्राने आदेश दिल्याने भारत बायोटेककडून ६७ लाख लसींचे डोस देण्यास नकार”

दरम्यान, सुचित्रा इल्ला यांनी आपल्या ट्वीटसोबत या १८ राज्यांची यादीही पोस्ट केली आहे. यामध्ये आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हरयाणा, जम्मू-काश्मीर, झारघंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, तामिळनाडू, त्रिपुरा, तलंगणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश असल्याचं त्यांनी शेअर केलेल्या पोस्टमधून दिसून येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2021 3:54 pm

Web Title: covaxin vaccine producer bharat biotech on delhi deputy cm manish sisodiya allegations pmw 88
टॅग : Corona,Coronavirus
Next Stories
1 “युपीमध्ये कुत्रे मृतदेहांचे लचके तोडतायत, कचऱ्याच्या गाडीतून मृतदेह नेले जातायत आणि योगी All Is Well म्हणतायत”
2 “B.1.617 हा करोनाचा उपप्रकार भारतीय नाही”, सर्व दावे निराधार असल्याचं केंद्र सरकारनं केलं स्पष्ट!
3 लसीकरण उत्सव साजरा केला, पण लसीची व्यवस्था नाही; प्रियांका गांधींची मोदींवर टीका
Just Now!
X