26 September 2020

News Flash

धर्मातरविरोधी कायद्याची गरज नाही -माकप

धर्मातराच्या मुद्दय़ावर भाजप दुतोंडीपणा करीत असून, सक्तीच्या धर्मातराला आळा घालण्याची तरतूद भारतीय दंड विधानातच असल्यामुळे धर्मातरविरोधी कायदा करण्याची काहीच गरज नाही, असे मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने

| December 22, 2014 01:52 am

धर्मातराच्या मुद्दय़ावर भाजप दुतोंडीपणा करीत असून, सक्तीच्या धर्मातराला आळा घालण्याची तरतूद भारतीय दंड विधानातच असल्यामुळे धर्मातरविरोधी कायदा करण्याची काहीच गरज नाही, असे मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने म्हटले आहे. रा.स्व. संघाच्या प्रेरणेने सुरू असलेल्या पुनर्धर्मातरणाच्या मोहिमेला विद्यमान कायद्यातील तरतुदींचा उपयोग करून प्रतिबंध करावा, अशी मागणी पक्षाच्या पॉलिट ब्युरोने केली आहे. धर्माच्या नावावर कुणी सक्ती केल्यास तो फौजदारी गुन्हा मानण्याची तरतूद भादंविच्या कलम १५३(अ)मध्ये आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी या ‘घरवापसी’ मोहिमेचे समर्थन केल्याबद्दल पक्षाने त्यांच्यावर हल्ला चढवला आहे. संघाने सक्तीच्या पुनर्धर्मातरणासाठी चालवलेली मोहीम आणि सक्तीच्या धर्मातराविरुद्ध कायदा करण्याची केलेली मागणी या दोन्ही गोष्टी धार्मिक अल्पसंख्याकांविरुद्ध असून, त्यामुळे धार्मिक दरी रुंदावेल, असे माकपच्या पॉलिट ब्युरोने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2014 1:52 am

Web Title: cpi m against anti conversion law
Next Stories
1 १०० ख्रिश्चनांची ‘घरवापसी’
2 ‘सामूहिक धर्मातर ही संशयास्पद कृती’
3 माजी केंद्रीय मंत्री नेपोलियन भाजपमध्ये
Just Now!
X