News Flash

मॉल्स, रेस्तराँमधील गर्दी ठरणार तिसऱ्या लाटेचं कारण; सर्वेक्षणातून समोर आली माहिती

पुढील ३० ते ६० दिवसांत देशभरातील नागरिक मॉल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर ठिकाणी मोठ्या संख्येने भेट देणार असल्याचे सर्वेक्षण

या सर्वेक्षणात भारतातील ३१४ जिल्ह्यांमधून ३४,००० पेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेतला होता

राज्यांतील निर्बंध शिथील केल्यानंतर पुढील ३० ते ६० दिवसांत देशभरातील नागरिक मॉल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर ठिकाणी मोठ्या संख्येने भेट देणार असल्याने लवकरच करोनाच्या तिसऱ्या लाट धडकण्याची शक्यता आहे. कम्युनिटी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, लोकल सर्कल्सच्या सर्वेक्षणानुसार, सुमारे ३१ टक्के नागरिकांनी पुढच्या ६० दिवसात जेवणासाठी रेस्टॉरंटला भेट देण्याचे ठरवले आहे, तर २९ टक्के लोक मॉलमध्ये जाण्याची शक्यता आहे. विस्तारित कुटुंब किंवा मित्र यातील ९० टक्के लोकांचा यामध्ये समावेश आहे.

या सर्वेक्षणात भारतातील ३१४ जिल्ह्यांमधून ३४,००० पेक्षा जास्त लोकांनी प्रतिसाद दिला आहे. यामध्ये ६६ टक्के पुरुष होते तर ३४ टक्के महिला, ४८ टक्के लोक पहिल्या श्रेणीतील, २७ टक्के दुसऱ्या  श्रेणीतील तर २५ टक्के लोक तीसऱ्या, चौथ्या आणि ग्रामीण जिल्ह्यातील होते. एप्रिल आणि मे मध्ये बहुतांश भागात बंद असल्याने बरीच रेस्टॉरंट्स आता उघडली आहेत. पुढच्या ६० दिवसांत यामध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे. सुमारे १८ टक्के लोकांनी जेवणासाठी रेस्टॉरंट्समध्ये एकदा जाण्याचा पर्याय निवडला आहे तर १३ टक्के लोकांनी अनेक जाणार असल्याचा पर्याय निवडला आहे. सुमारे ५३ टक्के नागरिकांनी अद्याप कोणतीही योजना आखलेली नाही.

हे ही वाचा >> Coronavirus: …तो पर्यंत मुंबई अनलॉक करणे धोक्याचं; टास्क फोर्सचा इशारा

रेस्टॉरंट्सप्रमाणेच, मॉल्सलादेखील परवानगी मिळाल्यानंतर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. सुमारे ९ टक्के नागरिकांनी अनेक वेळा मॉल्समध्ये जाणार असल्याचे म्हटले आहे तर २० टक्के लोकांच्या म्हणण्यानुसार एकदाच मॉलमध्ये जाणार आहेत. ५२ टक्के नागरिकांनी कोठेही जाणार नसल्याचे म्हटले आहे. म्हणजे एकूणच २९ टक्के नागरिक पुढील ६० दिवसात मॉलला भेट देणार आहेत. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात रहदारी होऊ शकते.

या सर्वेक्षणात, ६ टक्के नागरिक वस्तू खरेदी करण्यासाठी, ९ टक्के घरगुती खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी, ६ टक्के फिरण्यासाठी, आणि १ टक्के नागरिक सलून आणि स्पासारख्या सेवांचा लाभ घेण्यासाठी जाणार असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे ६३ टक्के नागरिकांनी ६० दिवसांत कोणत्याही मॉलला भेट देणार नसल्याचे सांगितले. दैनंदिन आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येत घट झाली असली तरी लोकांनी घराबाहेर पडण्यावर मर्यादा घालायला हवी. राज्यात अनलॉक झाल्याने अनेक कुटुंबे, मित्र परिवार एकत्र येत असल्याचे दिसत आहे अशी माहिती सरकारी आरोग्य अधिकारी आणि तज्ञांनी दिली आहे.

हे ही वाचा >> एक किंवा दोन महिन्यात महाराष्ट्रात ‘डेल्टा प्लस’ व्हेरिएंटमुळे येऊ शकते करोनाची तिसरी लाट; आरोग्य विभागाचा इशारा

पुढील ३० दिवसांत, १३ टक्के कुटुंब आणि नातेवाईक एकत्र येणार असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे. एकूणच सर्वेक्षणानुसार सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की पुढील ३० दिवसांत ७५ टक्के  भारतीय कुटुंब कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी घराबाहेर पडणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे करोनाच्या तिसऱ्या लाट धडकण्याची शक्यता आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2021 5:53 pm

Web Title: crowds in malls restaurants will be the cause of the third wave information from the survey abn 97
टॅग : Corona,Coronavirus
Next Stories
1 “पंतप्रधान आता वाराणसीला व्हेनिस बनवल्याचा दावा करतील”, जलमग्न वाराणसीवरुन टीका
2 ‘या’ भाजपा नेत्याने त्यांच्याच सरकारवर केला २१,४७३ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
3 ममता बॅनर्जींना नंदीग्राममधूनच निवडून यायचंय, पराभव अमान्य; प्रकरण न्यायालयात!
Just Now!
X