23 February 2019

News Flash

रोख रक्कम देत असल्याने आयपीएस अधिकरी डी रुपा यांनी नाकारला पुरस्कार

कर्तव्य हा पुरस्कार स्विकारण्याची परवानगी देत नाही

व्ही शशिकला यांना बंगळुरु कारागृहात मिळणा-या विशेष सुविधांचा पर्दाफाश करणा-या आयपीएस अधिकारी डी रुपा यांनी ‘नम्मा बंगळुरु पुरस्कार’ स्विकारण्यास नकार दिला आहे पुरस्कारासोबत मिळणारी रोख रक्कम जास्त असल्या कारणाने त्यांनी हा पुरस्कार नाकारला आहे. नम्मा बंगळुरु संस्थेकडून हा पुरस्कार दिला जाणार होता.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, डी रुपा यांनी नम्मा बंगळुरु संस्थेला पत्र लिहिलं असून आपलं कर्तव्य हा पुरस्कार स्विकारण्याची परवानगी देत नाही असं म्हटलं आहे. डी रुपा सध्या पोलीस महासंचालक पदावर आहेत.

‘राजकारणाशी थोडासाही संबंध असणा-या संस्था आणि संघटनांपासून दूर राहत प्रत्येक सरकारी कर्मचा-याने तटस्थता आणि समानतेचं पालन करणं अपेक्षित आहे. असं केलं तरच सरकारी कर्मचारी जनतेसमोर आपली स्वच्छ आणि स्पष्ट भूमिका मांडू शकतो’, असं डी रुपा यांनी आपल्या पत्रात लिहिलं आहे.

‘या सगळ्याचा लगेचच आगामी निवडणुकांशी संबंध लावला जाऊ शकतो’, अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे. राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. संस्थेकडून एकूण सात सरकारी कर्मचा-यांची सर्वोत्तम सरकारी अधिकारी म्हणून निवड करण्यात आली असून, यामध्ये डी रुपा यांच्या नावाचाही समावेश आहे. या संस्थेला भाजपाच्या एका नेत्याकडून फंडिंग मिळत असल्याची माहिती आहे.

नम्मा बंगळुरु फाऊंडेशनला राजीव चंद्रशेखर यांचं फंडिंग मिळत असून ते भाजपाचे राज्यसभा सदस्य आहेत. हे या पुरस्काराचे नववे पर्व आहे.

गतवर्षी कारागृह उपमहानिरीक्षक पदावर असताना डी रुपा यांनी व्ही शशिकला यांनी मिळणा-या व्हीआयपी वागणुकीचा पर्दाफाश केला होता. डी रुपा यांनी आपल्या अहलावात शशिकला यांनी व्हीआयपी वागणूक मिळावी यासाठी दोन कोटी रुपये दिल्याचा दावा केला होता.

First Published on March 26, 2018 4:44 pm

Web Title: d roopa rejects award with cash