News Flash

बिहारमधील बैठक लांबणीवर

येत्या २० फेब्रुवारीला जितन राम मांझी सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी वेगवेगळ्या पक्षांची विधानसभेत बसण्याची व्यवस्था कशी असावी,

| February 17, 2015 01:07 am

येत्या २० फेब्रुवारीला जितन राम मांझी सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी वेगवेगळ्या पक्षांची विधानसभेत बसण्याची व्यवस्था कशी असावी, हे ठरवण्यासाठी बोलावलेली बैठक अध्यक्ष उदयनारायण चौधरी यांनी १८ तारखेपर्यंत पुढे ढकलली आहे.चौधरी यांनी प्रमुख पाच राजकीय पक्षांच्या विधिमंडळ नेत्यांना सोमवारी चर्चेसाठी बोलावले होते. परंतु भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते नंदकिशोर यादव हे बैठकीला गैरहजर राहिल्यामुळे ही बैठक बुधवार, सकाळी १० वाजता होणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले. राज्यपाल कार्यालयाने पाठवलेल्या पत्रात ‘विरोधी पक्षनेता’ याऐवजी ‘भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते’ असा उल्लेख केल्यामुळे यादव बैठकीला आले नाहीत. जद(यू), राजद, काँग्रेस व भाकपचे नेते बैठकीला हजर होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2015 1:07 am

Web Title: delay in bihar cabinet meeting
Next Stories
1 लिबियात इसिसकडून २१ ख्रिश्चनांचा शिरच्छेद
2 केवळ भाषणबाजीने हिंदू ऐक्य अशक्य
3 केंद्रीय मंत्रिमंडळात किंडलचा वापर!
Just Now!
X