News Flash

Delta Plus variant चे देशभरात ४० रुग्ण; केंद्राचे राज्य सरकारांना पत्र

देशात जिवघेण्या करोना विषाणूची नवीन प्रकरणे कमी होत आहेत. परंतु आता करोनाच्या डेल्टा प्लस प्रकाराने देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

'डेल्टा प्लस'मुळे मध्ये प्रदेशात पहिला मृत्यू

देशात जिवघेण्या करोना विषाणूची नवीन प्रकरणे कमी होत आहेत. परंतु आता करोनाच्या डेल्टा प्लस प्रकाराने देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘डेल्टा प्लस’चे रुग्ण आता केवळ केरळ, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांपुरती मर्यादीत नाहीत. तर इतर राज्यात देखील याचा फैलाव होत आहे. त्यामुळे केंद्राने खबरदारीचा इशारा दिला आहे. डेल्टा प्लस’चे रुग्ण महाराष्ट्र, मध्य प्रदेश, केरळ, पंजाब, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, जम्मू आणि कर्नाटकात आढळले आहेत.

केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार डेल्टा प्लस प्रकार चिंताजनक आहे. त्यामुळे राज्यांनी जागरुक राहण्याची गरज आहे, तसेच प्रतिबंधावरही लक्ष केंद्रित केले पाहिजे. या प्रकाराबाबत केंद्र सरकारने महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेश सरकारला पत्र लिहिले आहे.

भारताव्यतिरिक्त आणखी नऊ देशांत डेल्टा प्लस प्रकार आढळला आहे. अमेरिका, ब्रिटन, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड, जपान, पोलंड, नेपाळ, चीन आणि रशिया येथे ‘डेल्टा प्लस’ प्रकार आढळून आला आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि केरळ राज्यांनी याबाबत खबरदारी सोबत योग्य निर्णय घ्यावा, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

हेही वाचा- Delta Plus Variant : “तातडीने पावलं उचला”, केंद्राचा महाराष्ट्रासह ३ राज्यांना इशारा!

महाराष्ट्रात २१ रुग्ण

सध्या महाराष्ट्रात २१ रुग्ण, मध्य प्रदेश ६, केरळ ३, तामिळनाडू ३, कर्नाटक २, आंध्र प्रदेश १, पंजाब १, जम्मू १ रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात आढळलेल्या ‘डेल्टा प्लस’च्या २१ रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण लक्षणेविरहित किंवा सौम्य लक्षणे असल्याचे प्राथमिक पाहणीत आढळले आहे. या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे आणि बाधित रुग्णांचे नमुने तपासण्यांसह सर्वेक्षण आरोग्य विभागाने सुरू केले आहे.

‘डेल्टा प्लस’चे रत्नागिरीत नऊ, जळगावमध्ये सात, मुंबईत दोन आणि पालघर, सिंधुदुर्ग आणि ठाणे येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. रत्नागिरीत सुरुवातीला सहा रुग्णांमध्ये ‘डेल्टा प्लस’ आढळले होते. त्यानंतर ५० जणांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात आले होते. त्यातून आणखी तीन जणांमध्ये हा विषाणू आढळला असून रत्नागिरीत या विषाणूचे सध्या नऊ रुग्ण झाले आहेत.

हेही वाचा- Corona Vaccine: डेल्टा व्हेरिएंटवर लसींचा प्रभाव नाही; WHO चा दावा

‘भय बाळगू नये’

करोनाच्या विषाणूचे उत्परिवर्तन होणे नैसर्गिक आहे. ‘डेल्टा’ किंवा ‘डेल्टा प्लस’ या उत्परिवर्तित प्रकारांचा धोरणात्मक दृष्टीने अभ्यास होणे गरजेचे आहे. परंतु सर्वसामान्य नागरिकांनी याचे भय बाळगू नये. करोनाच्या कोणत्याही उत्परिवर्तित विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी मुखपट्टीचा वापर, अंतर नियम, हातांची स्वच्छता हेच करोना प्रतिबंधात्मक उपाय आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता या उपायांचे पालन काटेकोरपणे करणे गरजेचे आहे, असे मत डॉ. प्रदीप आवटे यांनी व्यक्त केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2021 12:42 pm

Web Title: delta plus variant has 40 patients across the country letter from the center to the state governments srk 94
टॅग : Corona,Coronavirus
Next Stories
1 विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीला दणका! ९ हजार कोटींची संपत्ती बँकांकडे हस्तांतरित
2 मेहुल चोक्सीच्या अपहरणाचे पुरावे नाहीत पण लोकांमध्ये चर्चा; अँटिग्वाच्या पंतप्रधानाची माहिती
3 भाजपा आयटी सेलच्या दृष्टीने ‘हा’ देशद्रोह नाही का?; काँग्रेस खासदाराचा प्रश्न
Just Now!
X