भारतातील करोना स्थिती पाहता इतर देशांनी मदतीचा हात पुढे केला आहे. भारतातील वैद्यकीय उपकरणांचा तुटवडा पाहता अनेक देशांनी वैद्यकीय उपकरणं पाठवली आहेत. त्यामुळे रुग्णांवर वेळीच उपचार करता येणार आहे. डेनमार्कने भारताला ५३ व्हेंटिलेटर पाठवले आहेत. या व्हेंटिलेटरमुळे करोना रुग्णांवर उपचार करण्यास मदत होणार आहे.

कुवैतनही मदतीसाठी पुढाकार घेत ७५ मेट्रीक टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन आणि १०० ऑक्सिजन सिलेंडर पाठवले आहेत. ५ मे रोजी ही साधनसामुग्री घेऊन जहाज निघालं असल्याचं कुवैत दूतावासाकडून सांगण्यात आल आहे. हे जहाज १० मे रोजी भारतात येईल असं सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर आयएनएस क्रायोजेनिक टँकमध्ये ४० मेट्रीक टन लिक्विड ऑक्सिजन, २०० ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन कनन्सेट्रेटर आणि अन्य सामुग्री घेऊन निघालं आहे. आयएनएस कोलकाता ९ मेला भारतात येईल. याबरोबर भारतीय नौदलाची दोन जहाजं जवळपास १०० मेट्रीक टन मेडिकल ऑक्सिजन आणि १४०० ऑक्सिजन सिलेंडर घेऊन भारतात येत आहेत. ही जहाजं ११ मे रोजी मुंबईत येणार आहेत.

आपण कशी रोखू शकतो करोनाची तिसरी लाट? केंद्र सरकारच्या मुख्य वैज्ञानिक सल्लागारांनी सागितला मार्ग!

भारतातील करोना स्थिती पाहता अनेक देश मदत करत आहेत. देशातील प्रत्येक राज्यात ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. या मदतीमुळे राज्यांची मागणी पूर्ण करता येणार आहे. या मदतीमुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होईल. त्याचबरोबर रुग्णांनाही वेळेवर उपचार मिळतील.