भारत सर्वात गरीब देश असून या देशात स्पर्धेसाठी जाऊन चूक केल्याचे वक्तव्य फॉर्म्युला वनचा विश्वविजेता खेळाडू लुइस हॅल्मिटन केले आहे. लुइस हॅमिल्टनने वादग्रस्त वक्तव्य करत भारतीयांचा रोष ओढावून घेतला आहे. सर्वच स्तरावरून त्याच्यावर टीका होत आहे. सोशल मीडियावर भारतीय आपली नाराजी व्यक्त करत आहेत.

‘सिल्वर स्टोन ग्रांड प्रिक्स किंवा लंडन ग्रांड प्रिक्समध्ये सहभाग घेण्यासाठी गेल्यावर जबदरस्त वाटते. पण ज्यावेळी मी भारतामध्ये गेलो त्यावेळी मला खूप वाईट वाटले. तेथे सर्वकाही धक्कादायक आणि विचित्र होते. भारत एक गरीब देश आहे. तेथे जाऊन मी मोठी चूक केली, असे वक्तव्य फॉर्म्युला वन शर्यतीमधील अव्वल दर्जाचा खेळाडू लुइस हॅमिल्टनने केले. लुइस हॅमिल्टन म्हणाला की, ‘भारतासारख्या देशांमध्ये दर्जेदार ट्रक तयार करने माझ्या समजण्यापलीकडचे आहे. ज्यावेळी रेससाठी मी तेथे गेलो मला विचित्र वाटले. मला हे नाही समजत की, रेससाठी आपण अशा देशांमध्ये का जातो?’

गेल्या महिन्यात फॉर्मुला वनचे पाचव्यांदा विश्वविजेतेपद जिंकणाऱ्या लुइसने भारतातच नाही तर तुर्कीतील फॉर्मुला वन स्पर्धेच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तो म्हणाला की, ‘तुर्कीमध्ये स्पर्धेचा ट्रक चांगला आहे. तेथील वातावरणही चांगले आहे. मात्र, प्रेक्षकांच्या कमतरेतेमुळे सर्वकाही अपयशी ठरले. फॉर्मुला वनची स्पर्धा अशा देशांमध्ये घ्यावी जिथे प्रेक्षकांचा पाठींबा मिळायला हवा. त्यांना रेस पाहण्यात आनंद मिळावा. ज्या देशातील लोकांना फॉर्मुला वन स्पर्धेचे ज्ञान आहे अशा देशांमध्ये स्पर्धेचे आयोजन करायला हवे.’

कुठे आहे भारतात फॉर्म्युला वन ट्रॅक

‘द बुद्ध इंटरनॅशनल सर्किट’ हा भारतातील पहिला फॉर्म्युला वन ट्रॅक आहे. दिल्लीपासून २५ किमी अंतरावर ग्रेटर नोएडामध्ये एकूण ८७५ एकर क्षेत्रफळावर या ट्रॅकची उभारणी करण्यात आली आहे. तर प्रेक्षकांची एकूण आसनक्षमता दीड लाखांची असणार आहे.