24 September 2020

News Flash

आडवाणी आमचे प्रेरणास्थान, तिकीट कापलेलं नाही तर….- नितीन गडकरी

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने गुरुवारी १८४ उमेदवारांची यादी जाहीर केली असून यात लालकृष्ण आडवाणी यांना स्थान मिळालेले नाही

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने गुरुवारी १८४ उमेदवारांची यादी जाहीर केली असून यात लालकृष्ण आडवाणी यांना स्थान मिळालेले नाही. लालकृष्ण आडवाणी यांच्या गांधीनगर मतदार संघातून भाजपाने राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना उमेदवारी दिल्याने भाजपामध्ये आडवाणी यांच्या राजकीय पर्वाचा अस्त झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी आडवाणी आमचे प्रेरणास्थान असून त्यांचे तिकीट कापण्यात आलं नसल्याचं सांगितलं आहे. तर वाढतं वय आणि तब्बेतीच्या कारणामुळे संसदीय बोर्डाने हा निर्णय घेतलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी आमचे प्रेरणास्थान आहेत. पक्षातील प्रत्येकाच्या मनात त्यांच्याबद्दल आदर असून तिकीट कापलं म्हणून त्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष केलं असं होऊ शकत नाही. प्रत्येक पक्षात परिवर्तन होत असते आणि हा त्याचाच एक भाग आहे. वाढतं वय आणि तब्बेतीच्या कारणामुळे संसदीय बोर्डाने लालकृष्ण आडवाणी यांना तिकीट न देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली.

भाजपाने गुरुवारी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, राजनाथ सिंह, अमित शाह यांना स्थान मिळाले आहे. १९९८ पासून गांधीनगर मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आडवाणी यांच्या ऐवजी भाजपाने या मतदार संघातून अमित शाह यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ९१ वर्षीय आडवाणी यांना सक्तीची निवृत्ती दिल्याची सुरू झाली आहे.

भारतीय जनता पक्षात पूर्वी अटल बिहारी वाजपेयींच्या खालोखाल आडवाणींचे स्थान होते. भाजपाच्या राजकीय प्रवासात आडवाणी यांचे मोलाचे योगदान होते. १९९१ मध्ये पहिल्यांदा गांधीनगरमधून निवडून आल्यानंतर आडवाणी यांनी रथयात्रा काढली होती. राम मंदिरसाठी त्यांनी ही रथ यात्रा काढली होती आणि या रथयात्रेने भारतीय राजकारणाची दिशा बदलली होती. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निवड झाली आणि आडवाणी याचे पंतप्रधानपदाचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले.

लालकृष्ण आडवाणी यांनी स्वतः देखील यंदाची निवडणूक लढवणार नाही अशी भूमिका घेतली होती, असे समजते. आडवाणी यांची त्यांचा मुलगा किंवा मुलगी यांना उमेदवारी मिळावी अशी इच्छा असल्याचे समजते. आता आडवाणी यांना दुसऱ्या मतदार संघातून उमेदवारी दिली जाते की त्यांच्या कुटुंबातून कोणाला संधी दिली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2019 2:04 pm

Web Title: due to increasing age and heath issue ticket decline to lk advani informs nitin gadkari
Next Stories
1 धारवाड दुर्घटना : ढिगाऱ्याखालून ६२ तासांनंतर एकाला जिवंत बाहेर काढण्यात यश
2 आम्ही बॅकफूटवर दहशतवादाशी लढा देत नाही, सॅम पित्रोदा यांना जेटलींचं उत्तर
3 मोबाइल जाहिरात क्षेत्रात अमेझॉनचं गुगल, फेसबुकला आव्हान
Just Now!
X