News Flash

सुरक्षादलाला मोठे यश; कुपवाड्यात लष्कर ए तोयबाच्या २ दहशतवाद्यांचा खात्मा

पाकिस्तानच्या कुरापती सुरुच असल्याचे समोर येते आहे

सुरक्षादलाला मोठे यश; कुपवाड्यात लष्कर ए तोयबाच्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
संग्रहित छायाचित्र

जम्मू काश्मीर येथील कुपवाडा भागातील हंडवारा येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक झाली. यात लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षादलाला यश आहे.  एकूण तीन दहशतवादी  येथे होते असे सांगण्यात येते. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. सध्या गोळीबार थांबला असून शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे.

पाकिस्तानवर भारताने एअर स्ट्राईक केल्यापासून पाकिस्तानकडून दहशतवादी कारवायाच सुरुच आहेत. एकीकडे चर्चा करायची आहे, शांततेने प्रश्न सोडवू, दहशतवादाशी लढा देऊ असं म्हणायचं आणि दुसरीकडे कुरापती काढायच्या हे प्रकार सुरुच आहेत. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधले संबंध पुलवामा येथील हल्ल्यानंतर तणावपूर्ण झाले आहेत. अशात आता दहशतवाद्यांमध्ये आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2019 6:31 am

Web Title: encounter underway between terrorists and security forces in kupwara districts handwara area two to three terrorists believed to be trapped
Next Stories
1 विंग कमांडर अभिनंदन यांना वाघा बॉर्डरवर घ्यायला जाणं हा माझ्यासाठी सन्मान- कॅप्टन अमरिंदर
2 दहशतवादाविरोधात रशिया भारतासोबत, पुतिन यांचा मोदींना फोन
3 भारतीय वैमानिकाची आज सुटका
Just Now!
X