05 March 2021

News Flash

मोदी सरकारच्या निशाण्यावर नोकरशाह; आयएएस, आयएफसएस अधिकाऱ्यांच्या घरावर छापे

९ राज्यातील १८ नोकरशाहांच्या घरांवर छापे टाकण्यात आले आहे.

यापूर्वी मोदी सरकारच्या सांगण्यावरून अमलबजावणी संचालनालयाने (इडी) २ एप्रिल रोजी देशभरात अभियान चालवले होते.

नरेंद्र मोदी सरकारने आता नोकरशाहांविरोधात कंबर कसली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार मोदी सरकारने ऑपरेशन ब्लॅक मनी २ सुरू केले आहे. या अंतर्गत ९ राज्यातील १८ नोकरशाहांच्या घरांवर छापे टाकण्यात आले आहे. यामध्ये आयएएस, आयएफएस आणि इतर विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. दिल्ली, गोवा, पश्चिम बंगाल आदी भागातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

यापूर्वी मोदी सरकारच्या सांगण्यावरून अमलबजावणी संचालनालयाने (इडी) २ एप्रिल रोजी देशभरात अभियान चालवले होते. यामध्ये १ हजार बनावट कंपन्यांचा शोध घेण्यात आला होता. या सर्व कंपन्या काळा पैसा वापरत असल्याच्या संशयावर सर्च ऑपरेशननंतर समजलं होतं. इडीने देशभरातील १६ राज्यात हे शोध अभियान राबवले होते.
संशयास्पद कंपन्याच देशातील काळ्या पैशाचा मोठा मार्ग आहे. अंतिम माहिती मिळेपर्यंत इडीची टीम कोलकाता, मुंबई, अहमदाबाद, पणजी, कोची, बेंगळुरू, हैदराबाद, दिल्ली, लखनऊ, पाटणा, जयपूर, चंदीगढ, जालंधर, श्रीनगर, इंदूर आणि हरियाणातील ११० ठिकाणी पोहोचली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2017 4:12 pm

Web Title: enforcement directorate country wide raid on 18 bureaucrats
Next Stories
1 ‘बाबरी’ प्रकरणी अडवाणींसह भाजप नेत्यांवर खटला चालवावा; सीबीआयची सुप्रीम कोर्टाकडे मागणी
2 …तर मुंबईतून एकही विमान उडू देणार नाही; शिवसेना खासदारांचा इशारा
3 आरबीआयने केले पतधोरण जाहीर, रेपो रेट कायम
Just Now!
X