News Flash

भावाच्या मित्रासहित सहा जणांनी केला दोन दिवस बलात्कार, मुलीला जंगलात फेकून पसार

पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी फरार आहेत

संग्रहित प्रतीकात्मक छायाचित्र

झारखंडमधील चक्रधरपूर येथे एका तरुणीवर सहा जणांनी मिळून सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. तरुणी इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी आहे. बलात्कार केल्यानंतर आरोपी तरुणीला जंगलात फेकून पसार झाले. पीडित तरुणी ओडिशामधील आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीच्या भावाच्या मित्राने तिचं अपहरण केलं आणि चक्रधरपूर येथील एका घरात आपल्या मित्रांसोबत सामूहिक बलात्कार केला. बलात्कारानंतर तरुणीला जवळच्या जंगलात फेकून आरोपी पसार झाले. सर्व आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरु आहे.

’30 डिसेंबर रोजी तरुणी घरी जाण्यासाठी ट्रेनची वाट पाहत रेल्वे स्थानकावर उभी होती. यावेळी तिची भेट भावाच्या मित्रासोबत झाली. त्याने तरुणीला विशेष ट्रेनने घरी जाण्याचा सल्ला दिला. ट्रेनमध्ये बसल्यानंतर ट्रेन उलट्या बाजूला चक्रधरपूरच्या दिशेने जात असल्याचं तरुणीच्या लक्षात आलं. यावर आरोपीने लोटापहर स्थानकावर उतरुन बस पकडण्याचा सल्ला दिला’, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

स्थानकावर उतल्यानंतर आरोपी तरुणीला घेऊन एका घरी गेला. त्याचे पाच मित्रही त्या घरी पोहोचले आणि सलग दोन दिवस तरुणीवर बलात्कार केला. 1 जानेवारीला आरोपी तरुणीला सोडून फरार झाले. शुद्ध आल्यानंतर तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार केली. तपास करण्यासाठी पोलिसांची दोन पथकं तयार करण्यात आली असून एका पथकाला चक्रधरपूरला पाठवण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2019 2:27 pm

Web Title: engineering student gang rape in jharkhand
Next Stories
1 चीनमधल्या शाळेत विद्यार्थ्यांवर चाकू हल्ला, २० मुलांना भोसकलं
2 मनसे अध्यक्ष राज ठाकरे राहुल गांधींची भेट घेणार
3 सीव्हीसीच्या अहवालानुसार आलोक वर्मांना रजेवर पाठवण्याचा निर्णय: जेटली
Just Now!
X