दरमहा एक हजार रुपयांहून कमी निवृत्तिवेतन घेणाऱ्या ३२ लाख निवृत्तिवेतनधारकांना केंद्र सरकारच्या कर्मचारी निवृत्तिवेतन योजनेतील (१९९५) दुरुस्तीमुळे तत्काळ फायदा होणार आहे. या लाभार्थ्यांना यापुढे दरमहा किमान एक हजार रुपये निवृत्तिवेतन मिळणार आहे.
दरमहा एक हजारहून कमी निवृत्तिवेतन घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या २८ लाख एवढी होती, तर एकूण लाभार्थी ४४ लाख आहेत. सध्याच्या ४९ लाख लाभार्थ्यांपैकी अंदाजे ३२ लाख कर्मचाऱ्यांना महिनाकाठी एक हजारहून कमी निवृत्तिवेतन मिळत असून यात महिन्याकाठी ५०० रुपये निवृत्तिवेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.