इंटरनेच्या जगामध्ये बातम्या आणि अफवा यांच्यामधील फरक ओळखणे दिवसोंदिवस कठीण होतं चाललं आहे. असंच एक प्रकरण नुकतचं समोर आलं आणि तेही जगभरातील मोठ्या प्रसारमाध्यमांबरोबर. झालं असं की वर्ल्ड न्यूज डेली रिपोर्ट नावाच्या वेबसाईटने केलेली एक उपहासात्मक बातमी अनेक प्रसारमाध्यमांना खरी वाटली आणि त्यांनी ती जशीच्या तशी उचलली. ही बातमी होती ७५० टन व्हायग्रा एका औषध बनवणाऱ्या कंपनीने नदीत सोडण्याबद्दलची. जगभरामध्ये या बातमीची चर्चा झाली आणि अखेर या चर्चेचा फुगा फुटला तो ही बातमी खोटी असल्याचे समोर आल्यानंतर.

काय होती बातमी

Vodafone Idea FPO, Vodafone-Idea,
विश्लेषण : अर्ज करावा की करू नये.. व्होडाफोन-आयडिया ‘एफपीओ’बाबत तज्ज्ञांचे मत काय?
Yamaha introduces vibrant new color options across the MT15 V2 Fascino and Ray ZR portfolios Know Features And price
ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह यामाहा इंडियाने ‘या’ दुचाकींना केलं उपडेट; पाहा कलर ऑप्शन…
whatsapp and instagram down
व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम सेवा खंडीत; जाणून घ्या मध्यरात्री काय झालं?
why Tata and Wipro want to buy Aachi Masala food company
Tata and Wipro : टाटा – विप्रो कंपनीला आची मसाला कंपनी २००० कोटी रुपयांना का खरेदी करायची आहे?

या व्हायरल झालेल्या बातमीमध्ये दक्षिण आयर्लंडमधील मेंढपाळांच्या मेंढ्यांचे वर्तवणुक बदलल्याचे म्हटले होते. अनेक मेंढ्या नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात सेक्स करत असल्याचे अनेक मेंढपाळांच्या लक्षात आल्याचे या बातमीत नमूद करण्यात आलेलं. या समस्येच्या मुळाशी गेल्यावर व्हायग्रा बनवणाऱ्या फायझर कंपनीकडून नदीमध्ये सोडल्या जाणाऱ्या पाण्यामध्ये चूकून ७५५ टन व्हायग्रा सोडण्यात आला होता. कंपनीच्या मालकीच्या एका कारखान्यामध्ये चुकून एवढ्या मोठ्याप्रमाणात व्हायग्रा पाण्यामध्ये सोडण्यात आला. याच नदीचे पाणी प्यायल्याने मेंढ्या अती जास्त प्रमाणात सेक्स करु लागल्या असं या वृत्तात म्हटलं होतं. ‘मेंढ्याच्या या अशा वागण्यामुळे या भागातील मेंढपाळांना आपल्या मेंढ्यांना सेक्स करण्याचा आजार झाल्याची भिती वाटत होती. अखेर कंपनीने स्पष्टीकरण देत आपली चूक सुधारल्यानंतर शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला असून कंपनीने सदोष यंत्रणेमध्ये बदल केला आहे,’ असंही या वृत्तात म्हटलं आहे.

सत्य काय?

वर्ल्ड न्यूज डेली रिपोर्ट या वेबसाईटवरील बातमी पाहता पाहता व्हायरल झाली. साईटवरील माहितीनुसार २१ हजार जणांनी ही बातमी फेसबुकवर शेअर केली. मात्र या वेबसाईटच्या नावामध्येच ‘Where Facts Don’t Matter’ म्हणजेच ‘येथील गोष्टी खऱ्याच असतील असं नाही,’ हे वाक्य नमूद करण्यात आलं आहे. या लेखाच्या शेवटी अगदी तळाशी या वेबसाईटने, “ही बातमी एक कल्पनात्मक, उपहासात्मक वृत्त असून. या बातमीतील सर्व माहिती काल्पनिक आहे. या बातमीमधील माहितीचा जिवंत अथवा मृत व्यक्तीशी कोणत्याही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या संबंध असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा,” असं म्हटलं आहे. म्हणजे बातमीत नमूद केलेल्याप्रमाणे मेंढ्या अती जास्त प्रमाणात सेक्स करण्याचा कोणताही प्रकार आयर्लंडमध्ये घडलेला नाही.

हे वृत्त खोटं असलं तरी अनेक प्रसारमाध्यमांना ते खरं असल्याचं वाटलं. त्यामुळेच अनेेक वेबसाईटने याच वृत्तावरुन बातम्या केल्या. मात्र याच वृत्ताच्या अगदी तळाला असणाऱ्या सुचनेकडे अनेकांचे लक्षच गेले नाही. हे वृत्त व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी हा प्रकार प्रसारमाध्यमांच्या लक्षात आणून दिला. त्यानंतर बऱ्याच प्रसारमाध्यमांनी संंबंधित बातमी आपल्या वेबसाईटवरुन काढून टाकली.