30 September 2020

News Flash

‘फेक आरोग्य सेतू’ अ‍ॅपद्वारे कट रचतोय पाकिस्तान; भारतीय लष्कराला धोका, अलर्ट जारी

भारतीय सुरक्षा एजन्सींनी दिला इशारा...

करोना व्हायरसविरोधातील लढ्यासाठी केंद्र सरकारने लॉन्च केलेल्या Aarogya Setu अ‍ॅपशी साम्य असलेल्या, फेक आरोग्य सेतू अ‍ॅपद्वारे पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणा भारतीय जवानांचे फोन हॅक करण्याचा कट रचत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याबाबत भारतीय सुरक्षा एजन्सींनी इशारा दिला असून मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.

वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, सुरक्षा एजन्सींकडून एका पाकिस्तानी फेक मोबाइल अ‍ॅपबाबत सतर्क राहण्याचा इशारा जवानांना देण्यात आला आहे. त्या अ‍ॅपद्वारे फोनमधून संवेदनशील डेटा चोरी करण्याचा प्रयत्न असू शकतो, असा इशारा अधिकाऱ्यांनी सैन्यदल आणि निमलष्करी दलाच्या जवानांना दिला. व्हॉट्सअ‍ॅप, एसएमएस, इ-मेल किंवा इंटरनेट आधारित सोशल मीडियाच्या एखाद्या लिंकद्वारे हे अ‍ॅप युजर्सच्या फोनमध्ये पोहोचू शकते. त्यामुळे जवानांनी केवळ अधिकृत वेबसाइट mygov.in यावरुनच आरोग्य सेतू अ‍ॅप डाउनलोड करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

फेक आरोग्य सेतू अ‍ॅप डाउनलोड करताना अतिरिक्त अ‍ॅप्लीकेशन पॅकेज इंस्टॉल करण्याची परवानगी मागितली जाते. सुरक्षा एजन्सींनी सांगितले की, एकदा परवानगी दिल्यानंतर सर्व्हरद्वारे फोनमध्ये फेस डॉट एपीके, आयएमओ डॉट एपीके, नॉर्मल डॉट एपीके, ट्रूसी डॉट एपीके, स्नॅप डॉट एपीके आणि व्हायबर डॉट एपीके यांचा शिरकाव होतो. या सर्व व्हायरसमुळे हॅकरला युजर्सच्या मोबाइलमधील सर्व माहिती मिळते आणि युजरच्या अ‍ॅक्टिव्हिटीवर नजर ठेवता येते. चोरलेला सर्व डेटा कंट्रोल सर्व्हरला पाठवला जातो. हे कंट्रोल सर्व्हर नेदरलँड्समध्ये असण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. त्यामुळे सैनिकांनी आपल्या मोबाइल फोनवर सोशल मीडिया आणि ई-मेलवर संशयास्पद लिंक ओपन करताना खबरदारी बाळगण्यास सांगण्यात आले आहे. तसेच फोनमध्ये अँटी व्हायरस देखील इंस्टॉल करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2020 2:01 pm

Web Title: fake aarogya setu app from pakistan alert by agencies to indian army sas 89
Next Stories
1 Free America Now : इलॉन मस्कने केली ‘लॉकडाउन’ हटवण्याची मागणी !
2 ‘व्हाइट हाउस’ने पंतप्रधान मोदींना अचानक केले ‘अनफॉलो’, राहुल गांधी म्हणतात…
3 माकडांनाही समजलं सोशल डिस्टन्सिंगचं महत्त्व… अन् मानवाला…?
Just Now!
X