25 September 2020

News Flash

Good News! पीएफवर मिळणाऱ्या व्याजदरात वाढ

केंद्र सरकारने २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदरात वाढ करत कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर दिली आहे.

केंद्र सरकारने २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदरात वाढ करत कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर दिली आहे. आता कर्मचारी भविष्य निधीवर (ईपीएफ) चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के इतके व्याज मिळणार आहे. याचा फायदा तब्बल ६ कोटी कर्मचाऱ्यांना होणार आहे. ‘ईपीएफओ’ने घेतलेल्या निर्णयाला केंद्रीय अर्थ मंत्रालयाने आज हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे आता पीएफवर ८.६५ टक्के इतके व्याज मिळणार आहे.

गेल्या आर्थिक वर्षामध्ये भविष्य निर्वाह निधीवर ८.५५ टक्के व्याजदर होते आता २०१८-१९ मध्ये ०.१० टक्के वाढवून ८.६५ टक्के करण्यात आला आहे. व्याजदर वाढीबाबतचा प्रस्ताव कर्मचारी भविष्य निधी संगठनाने (ईपीएफओ) पाठवला होता. त्या प्रस्तावाला अर्थ मंत्रालयाने मंजूरी दिली आहे. त्यामुळे चांगले व्याज मिळणार आहे. गेल्या तीन वर्षांतील ही पहिली व्याजदरवाढ ठरली आहे.

२०१५-२०१६ या आर्थिक वर्षात ८.८ टक्के इतका व्याजदर होता. तो २०१६-२०१७ मध्ये ८.६५ टक्क्यांवर आणण्यात आला. २०१७-१८ मध्ये तो कमी करण्यात आला. तो ८.५५ टक्के कमी करण्यात आला. आता पुन्हा यात वाढ करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2019 5:52 pm

Web Title: finance ministry ratifies 8 65 interest on epf for 2018 19
Next Stories
1 नोटाबंदीच्या निर्णयामुळे राज ठाकरेंचे दुकान बंद, मुख्यमंत्र्यांचा टोला
2 शिर्डीतल्या सभेत नितीन गडकरींना भोवळ
3 दोन कारखान्यांच्या तुलनेत देशात आता १२५ मोबाइल कारखाने – पंतप्रधान मोदी
Just Now!
X