News Flash

चीनमध्ये ‘मंकी बी’ व्हायरसमुळे पहिल्या मृत्यूची नोंद; जाणून घ्या या नव्या व्हायरसबद्दल सर्व काही

चीनमध्ये Monkey B व्हायरसचा पहिला बळी गेला आहे.

करोना व्हायरसप्रमाणे मंकी बी व्हायरसची प्राथमिक लक्षणे आहेत

करोनाने संपुर्ण जगात हाहाकार केला. चीन पासून करोनाची सुरवात झाली आणि तो संपुर्ण जगात पसरला, असा दोष आताही चीनला दिल्या जातो. आता पुन्हा एकदा चीनमध्ये धोक्याची घंटा वाजली आहे. चीनमध्ये Monkey B व्हायरसचा पहिला बळी गेला आहे. चीन सीडीसी वीकलीनुसार, मार्चच्या दोन मृत माकडांचे ऑपरेशन केल्यानंतर बीजिंगमधील पशुवैद्यकीय शल्यचिकित्सकांना या धोकादायक विषाणूची लागण झाली. त्यानंतर २७ मे रोजी त्यांचे निधन झाले.

Monkey B व्हायरसची लागण झालेल्या ५३ वर्षीय डॉक्टरला पहिल्यांदा मळमळ आणि उलट्यांचा त्रास झाला. त्यानंतर ताप आणि न्यूरोलॉजिकल समस्या जानवल्या. ते अनेक रुग्णालयात उपचारासाठी गेले परंतु २७ मे रोजी त्यांचे निधन झाले. या डॉक्टरने दोन माकडांचे ऑपरेशन केले होते.

सीडीसी साप्ताहिकानुसार, संशोधकांनी रुग्णाचे रक्त, गळ्याचील स्वॅब, नाकातील स्वॅब तपासणीसाठी National Institute for Viral Disease Control and Prevention या संस्थेत पाठवले. यानंतर संस्थेने सॅंपलची तपासणी केली. ही तपासणी मंकी बी व्हायरस, जोस्टर व्हायरस,  (varicella-zoster virus -VZV), मंकीप्रॉक्स व्हायरस आणि ऑर्थोपोक्सव्हायरसाठी (monkeypox virus and orthopoxvirus) होती. यामध्ये केवळ मंकी बी व्हायरसचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला.

काय आहेत लक्षणे?

करोना व्हायरसप्रमाणे मंकी बी व्हायरसची प्राथमिक लक्षणे आहेत. ज्यात ताप आणि थंडी, स्नायू दुखणे, थकवा आणि डोकेदुखी यांचा समावेश आहे. कालांतराने, विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तीस जखमेत लहान लहान फोडं येऊ शकतात, तर इतर लक्षणांमध्ये श्वास घेण्यास अडथळा, मळमळ आणि उलट्या होणे, पोटदुखीचा समावेश आहे.

काय आहे मंकी बी व्हायरस?

चिनी सीडीसी वीकलीनुसार, मंकी बी व्हायरस थेट संपर्काद्वारे आणि शरीराबाहेर द्रव्याव्दारे बाहेर पसरतो. हा व्हायरस १९३२ मध्ये आढळला होता. हा व्हायरस थेट संपर्क आणि शारीरिक स्रावाद्वारे पसरतो.  हा व्हायरस आफ्रिकन लंगूरपासून उद्भवला आहे. आतापर्यंत ६० प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यातील ७० ते ८० टक्के रुग्णांचा  मृत्यू झाला आहे. यूएस नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार जेव्हा मंकी व्हायरस मानवामध्ये पसरतो तेव्हा तो केंद्रीय मज्जासंस्थेवर प्रभावीत होतो. व्हायरची लागण झाल्यानंतर १ ते ३ आठवड्यानंतर लक्षणे दिसतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2021 5:21 pm

Web Title: first death due to monkey b virus in china learn all about this new virus srk 94
टॅग : China
Next Stories
1 अधिवेशनाच्या एक दिवस आधी पेगॅससचा रिपोर्ट येणं योगायोग तर नाही; IT मंत्र्यांनी व्यक्त केली शंका
2 Pegasus Snoopgate : “ज्यांनी कायम यंत्रणाचा यथेच्छ गैरवापर केला, हीच पाळतखोर मंडळी आकांडतांडव करताहेत”
3 “मुस्लीम समाजात लोक २-२, ३-३ लग्न करतात आणि १०-१० पोरं जन्माला घालतात, यावर बंधनं आणण्याची गरज”
Just Now!
X