News Flash

खरेदी-विक्री संकेतस्थळावर सूनेने दिली ‘सासू-विक्री’ची जाहिरात

सासू आणि सूनेचे संबंध अनेकवेळा सौहार्दाचे नसल्याचे आढळून येते.

सासू आणि सूनेचे संबंध अनेकवेळा सौहार्दाचे नसल्याचे आढळून येते. एका नाराज सूनबाईने आपल्या सासूच्या विक्रीची जाहिरात संकेतस्थळावर पोस्ट केली. ‘फायदा डॉट कॉम’ नावाच्या संकेतस्थाळावर देण्यात आलेल्या या जाहिरातीत एका वयोवृद्ध महिलेचे छायाचित्र देण्यात आले असून, ‘Mother in Law in Good Condition’ असे शीर्षक देण्यात आले आहे. ही जाहिरात देणारी स्त्री कोण आहे आणि कोठे राहाते, याबाबत आतापर्यंत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या जाहीरातीचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. त्यानंतर ही जाहिरात संकेतस्थळावरून ताबडतोब काढून टाकण्यात आली. जाहिरातीसोबत दिलेल्या माहितीत वृद्ध महिलेला अनेक टोमणे मारण्यात आले आहेत.

आवाज : इतका गोड की जवळच्यांचा जीव घेईल.
वय : ६० वर्षांच्या आसपास
सद्यस्थिती : चालती-बोलती (कंडीशनः फंक्शनल)
खाण्याची टीकाकार : जेवणाला नावे ठेवणारी असून, कितीही चांगले जेवण बनवले, तरी त्रुटी शोधणार.
गुण : उत्तम सल्लागार. जे केले आहे त्यापेक्षा अधिक चांगले कशाप्रकारे करू शकता हे सांगायला ती जरासुद्धा उशीर लावत नाही.
किंमत : काहीही नसून, बदल्यात डोक्याला शांतता देणाऱ्या पुस्तकांची गरज

संकेतस्थळाद्वारे जाहिरात काढून टाकण्यात आली

आम्ही अशा खोडसाळ जाहिरातींवर सतत नजर ठेऊन असल्याचे सांगत ‘फायदा डॉट कॉम’चे सह-संचालक विपुल पालिवाल म्हणाले, अशाप्रकारची जाहिरात काही काळासाठी संकेतस्थळावर अवतरली असे पहिल्यांदाच झाले आहे. ही बाब कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच दहा मिनिटांत त्यांनी ही जाहिरात संकेतस्थळावरून काढून टाकली.

‘क्विकर’वर आली होती अशास्वरुपाची जाहिरात

गेल्या वर्षी ‘क्विकर डॉट कॉम’वरील पाळीव प्राण्यांच्या विभागात अशाच प्रकारची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. एका पत्नीने तिच्या पतीचे छायाचित्र संकेतस्थळावर पोस्ट करून जाहिरात दिली होती. नंतर कंपनीने ही जाहिरात संकेतस्थळावरून काढून टाकली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2015 4:58 pm

Web Title: frustrated women puts her mother in law for sale on internet
टॅग : Mother In Law
Next Stories
1 २२ कोटींची रोकड घेऊन पळालेल्या ड्रायव्हरला पकडण्यात यश
2 उत्तर कोरियात किम जोंग-उन यांच्या ‘अॅम्बिशिअस’ केशरचनेचे अनुकरण बंधनकारक
3 ब्रिटनमधील सुरक्षेसाठी आयसिसच्या तळांवर हल्ले गरजेचे – कॅमेरून
Just Now!
X