पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहशतवाद मानवतेसाठी सर्वात मोठा धोका असल्याचे म्हटले असुन, यामुळे केवळ निष्पापांचाच जीव जात नाही तर आर्थिक विकास व सामाजिक स्थिरतेवर देखील याचा परिणाम होतो. तसेच, दहशतवाद व वंशवादाचे कोणत्याही प्रकारे समर्थन झाले नाही पाहिजे असे मोदींनी सांगितले. जपान मधील ओसाका येथे ब्रीक्स राष्ट्रांच्या बैठकीत ते बोलत होते. जी-२० शिखर संमेलनासाठी मोदी या ठिकाणी गेलेले आहेत.
PM Modi takes up issue of terrorism with all aggression at G-20 Summit
Read @ANI story | https://t.co/8enUu3D5Fo pic.twitter.com/1zC1vEuFjw
— ANI Digital (@ani_digital) June 28, 2019
यावेळी पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये इराण आणि सुरक्षाविषयक संबंधांबद्दल चर्चा झाली. तसेच, मोदींनी आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी अमेरिका, दक्षिण कोरिया, सौदी अरब व जर्मनीसह तीन बहुपक्षीय बैठकांमध्ये सहभाग नोंदवला. त्यांनी व्हिएतनाम व जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपा यांच्यासह देखील बैठक केली.
ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिकेसह ब्रीक्स समूहाच्या नेत्यांबरोबर बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदींनी दहशतवाद व नक्षलवादाचे समर्थन करणाऱ्या सर्व माध्यामांना संपवण्यासाठी योगदान देण्याचा आग्रह केला. त्यावर ब्रीक्स राष्ट्रांनी दहशतवादाचा कायमचा बिमोड करणे ही सर्वांचीच जबाबदारी असल्याचे म्हटले. एका सार्वजनिक वक्तव्यात ब्रीक्स नेत्यांनी म्हटले की, आम्ही दहशतवादी हल्ल्यांचा निषेध करतो. यावेळी भ्रष्टाचाराच्या मुद्दयावरून देखील मत व्यक्त करण्यात आले. बेकायदा आर्थिक घडमोडींना तोंड देण्यासाठी आंरराष्ट्रीयस्तरावर सहकार्य करण्यासाठी देखील सर्व देशांनी कटिबध्दता दर्शवली.