10 August 2020

News Flash

गडकरींची केजरीवाल यांना नोटीस

भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कायदेशीर कारवाईचा इशारा देणारी नोटीस पाठवली आहे.

| February 1, 2014 02:03 am

भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कायदेशीर कारवाईचा इशारा देणारी नोटीस पाठवली आहे. भ्रष्टाचारी म्हणून हिणवत आपली बदनामी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
अरविंद केजरीवाल यांनी गडकरींचा भ्रष्टाचारी नेत्यांच्या यादीत समावेश केल्याने संतापलेल्या गडकरींनी त्यांना ही नोटीस पाठवली. केजरीवालांनी येत्या तीन दिवसात जाहीर माफी मागावी अन्यथा तुमच्या विरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल करु असा इशारा गडकरींनी या नोटीसमध्ये दिला आहे.
केजरीवालांनी आपल्यावर केलेले सर्व आरोप खोटे, चुकीचे आणि आधरहीन असल्याचा दावा गडकरींनी केला आहे. दिल्ली प्रमाणेच देशाच्या इतर भागातही चमत्काराची अपेक्षा बाळगून असलेल्या आपच्या अरविंद केजरीवालांनी काल भ्रष्टाचारी नेत्यांची यादी सादर केली. या यादीमध्ये गडकरींच्या नावाचाही समावेश आहे. आगामी निवडणूकीत आप या भ्रष्ट नेत्यांना पराभूत करणार असल्याचे केजरीवालांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 1, 2014 2:03 am

Web Title: gadkari file case against kejriwal
Next Stories
1 काश्मीरमधील चकमकीत दहशतवादी ठार
2 विना-अनुदानित सिलिंडर्सच्या किंमतीत १०७रू.ची घट; डिझेल ५० पैशांनी महागले
3 समविचारी पक्षांच्या आघाडीचे प्रयत्न सुरू – नितीशकुमार
Just Now!
X