गलवान खोऱ्यात झालेल्या लष्करी संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले. या संघर्षानंतर केंद्र सरकारवर टीकेचे बाण सोडले जात असून, जेएनयूतील माजी विद्यार्थी नेता कन्हैया कुमारनंही याच मुद्यावरून सरकारला लक्ष्य केलं आहे.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्यासाठी भारत व चीन यांच्या लष्करी स्तरावरील चर्चा सुरू असताना १५ जून रोजी गलवान खोऱ्यात मोठा संघर्ष उफाळून आला. या संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाले. याप्रकरणावर सरकाकडून अधिकृत माहिती न आल्यानं विरोधकांनी टीका केली होती. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या दाव्यावरून बराच वाद निर्माण झाला आहे. चिनी सैन्यानं भारताच्या भूभागात घुसखोरी केली नव्हती, असा दावा मोदी यांनी केला होता.

आणखी वाचा- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनला क्लीन चिट दिली का?- चिदंबरम

पंतप्रधानांनी केलेल्या दाव्यानंतर जेएनयूतील विद्यार्थी नेता कन्हैया कुमारनं सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. “घरात घुसून मारू असं म्हणत सत्तेत आलेली व्यक्ती आपले २० जवान शहीद झाल्यानंतर म्हणतेय की घरात कुणी घुसलंच नाही,” असं ट्विट करत कन्हैयानं पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला.

आणखी वाचा- “जर जमीन चीनची होती, तर आपल्या जवानांना का मारण्यात आलं?”; राहुल गांधींकडून पंतप्रधानांची ‘प्रश्न’कोंडी

आणखी वाचा- भारत-चीन वादावरून प्रशांत किशोर यांचा केंद्र सरकारवर निशाणा

काय म्हणाले होते पंतप्रधान पंतप्रधान मोदी?

देशाकडे कुणीही वाकड्या नजरेने पाहू शकत नाही. चीनकडून सीमेवर कोणत्याही प्रकारची घुसखोरी झाली नसून चीनला उत्तर देण्यास भारतीय लष्कर सक्षम आहे. प्रत्यक्ष ताबा रेषेवर चीनच्या दुष्कृत्यामुळे प्रत्येक देशवासीयाच्या मनावर आघात झाला आहे. पण चीनने गलवान खोऱ्याच्या भूभागावर ताबा मिळवलेला नाही. भारत शेजारी राष्ट्रांशी शांततेने राहू इच्छितो. त्यांच्याशी मैत्रिपूर्ण संबंध ठेवू इच्छितो पण, देशासाठी सार्वभौमत्व सर्वाधिक महत्त्वाचे आहे. भारत कधीही परकीय दबावापुढे झुकलेला नाही. देशाच्या सुरक्षेसाठी आवश्यक कारवाई केली जाईल. केंद्र सरकारने लष्कराला गरजेनुसार आवश्यक कारवाई करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. देशाला आपल्या जवानांच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास असून अवघा देश त्यांच्या पाठिशी आहे”, असं मोदी सर्वपक्षीय बैठकीत म्हणाले होते.