दक्षिण गोव्यातील सावर्डे गावात असणारा पोर्तुगीजकालीन पूल ५० जण नदीत पडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यात दोघांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. अजूनही ३० लोक बेपत्ता असल्याचे समजते. अजूनही बचावकार्य सुरू आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एक तरुण या पुलावरुन उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होता. अनेकजण त्या तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी हा पूल अचानक नदीत कोसळला आणि अनेकजण नदीत पडले.

 

या पूलावरील ५० लोक नदीत पडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बसवराज मालनवर या तरुणाचा मृतदेह हाती लागला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही लोक पोहत बाहेर आले होते. पण काहींबाबत अजून काही माहिती समजले नसल्याचे ते म्हणाले. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या अपघाताबाबत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याशी बोलणे झाले असल्याची माहिती ट्विटरवरून दिली. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणाची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.