तुमचे वैयक्तीक ई-मेल आणि कामाशी संबंधीत काही नोंदींचे तुमच्या मृत्यूनंतर काय होणार ? याच्या चिंतेत आहात. आता घाबरायची काही एक गरज नाही. कारण, गुगलने अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेच्या माध्यमातून मृत्यूनंतर तुमच्या सर्व महत्त्वाच्या ‘ऑनलाईन डॉक्युमेंट्स’चे आणि ‘ई-मेल्स’चे काय करायचे याचे ‘डिजिटल इच्छापत्र’ तयार करता येणार आहे.
मृत्यूनंतर आपल्या ई-मेल्स मधील माहीती, महत्त्वाची छायाचित्रे आणि इतर माहितीचे काय करायचे, हे आता आधिच ठरवता येणार आहे. ‘गुगल’ ‘इनऍक्‍टिव्ह अकाउंट मॅनेजर’ सुरू करणार आहे याच्या माध्यमातून एखादे ‘अकाऊंट’ काही कालावधीकरता एकदाही वापरले गेले नाही तर, त्या ‘अकाऊंटवरील’ माहितीचे काय करायचे याची पूर्वसूचना गुगलला देता येणार आहे. यासुविधेमध्ये आपली गुगल ड्राईव्ह, जी-मेल, यू-ट्यूब किंवा गुगल प्लस यातील माहिती दुस-या व्यक्तीला उपलब्ध करून द्यावी की, ते अकाऊंट डिलीट करावे याची सूचना आता गुगलला देता येणार आहे.
यात ‘मॅसेज अकाऊंटच्या सेटींग पेजमध्ये’ ‘गुगल’ तुमच्या काही इंटरनेटच्या जालात असलेल्या तुमच्या मित्रांची किंवा नातेवाईकांची नावे सूचवेल त्यांना तुम्ही तुमची माहिती उपलब्ध करुन देऊ शकता किंवा आपल्या अकाऊंटचा डिलीट करण्याचा कालावधीही आपल्याला गुगलला सूचवता येईल