News Flash

लोकपाल शोध समितीचे नवे नियम अधिसूचित

लोकपाल शोध समितीचे नवे नियम सरकारने अधिसूचित केले आहेत. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने अध्यक्ष आणि सदस्य यांच्या नावांची जी यादी सादर केली आहे

| September 4, 2014 03:44 am

लोकपाल शोध समितीचे नवे नियम सरकारने अधिसूचित केले आहेत. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने अध्यक्ष आणि सदस्य यांच्या नावांची जी यादी सादर केली आहे त्यापेक्षा निराळ्या व्यक्तींची शिफारस करण्याचे अधिक स्वातंत्र्य या समितीला देण्यात आले आहे.
यापूर्वीचे नियम यूपीए सरकारने तयार केले होते. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने विचार केलेले एक पॅनल तयार करणे शोध समितीवर बंधनकारक होते. मात्र नव्या नियमांमुसार सरकारने शोध समितीवरील र्निबध वगळले आहेत.
सरकारने शोध समितीमधील सदस्यांच्या संख्येतही कपात केली असून आता आठऐवजी समितीमध्ये सात सदस्य असतील. या सदस्यांना भ्रष्टाचारविरोध, सार्वजनिक प्रशासन आणि दक्षता या बाबतचे विशेष ज्ञान असावे, असेही नियमांत म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2014 3:44 am

Web Title: government notifies new lokpal search panel rules
टॅग : Lokpal
Next Stories
1 सदानंद गौडा यांच्या मुलाविरोधात अटक वॉरंट
2 जम्मू-श्रीनगर महामार्ग ठप्प
3 पाकिस्तानात प्रभाव वाढविण्यास ‘आयएसआयएस’प्रयत्नशील
Just Now!
X