News Flash

उत्तरप्रदेशः पंतप्रधानांच्या विरोधात बोलल्याने सरकारी अधिकारी निलंबित

गेल्या वर्षीही याच कारणामुळे एका अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं होतं.

गेल्या वर्षीही उत्तरप्रदेश सरकारने एका अधिकाऱ्याला अशाच प्रकरणात निलंबित केलं होतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अपमानास्पद भाष्य केल्याच्या आरोपावरुन एका सरकारी अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात आलं आहे. उत्तरप्रदेशातल्या जखनिया भागाचे उपजिल्हाधिकारी सूरज यादव यांनी शनिवारी सांगितलं की ओडरायी गावाचे लेखापाल जितेंद्रनाथ सिंह यांनी पंतप्रधानांच्या विरोधात अपमानास्पद भाष्य केलं. हे सरकारी नियमावलीच्या विरुद्ध आहे.

सूरज यादव यांनी सांगितलं की तक्रार मिळाल्यानंतर या प्रकाराबद्दल तपास करण्यात आला. या तपासाअंती हे आरोप सत्य असल्याचं समोर आलं आहे. यानंतर लेखापाल जितेंद्रनाथ यांना सरकारी नियमावलीचं पालन न केल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

हेही वाचा- “…मग हवं तर मन की बात पण सांगा” ; राहुल गांधींनी मोदींवर साधला निशाणा!

याआधीही सरकारी अधिकाऱ्यांवर अशा पद्धतीची कारवाई झाली आहे. गेल्यावर्षी एप्रिलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारी पोस्ट एका अधिकाऱ्याने सोशल मीडियावर केली होती. यावरुन वाद निर्माण झाल्यानंतर या अधिकाऱ्याने ही पोस्ट डिलीट केली होती. मात्र उत्तरप्रदेश सरकारने या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करत या अधिकाऱ्याला निलंबित केलं.

आणखी वाचा- स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने लसीकरणाला चालना द्या- मोदी

एवढंच नव्हे तर २०१९च्या निवडणुकांच्या वेळी ओडिसाच्या संबलपूरमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या हेलिकॉप्टरची चौकशी करण्याच्या प्रकरणात निवडणूक आयोगाने एका अधिकाऱ्याला निलंबित केलं होतं. आयोगाचं म्हणणं होतं की या आयएएस अधिकाऱ्याने एसपीजी सुरक्षेशी निगडीत आयोगाच्या निर्देशांचं पालन केलं नाही.एसपीजी सुरक्षा असलेल्या लोकांना अशा प्रकारच्या चौकशीतून सूट असते. त्यामुळे या नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2021 11:18 am

Web Title: government officer suspended due to commenting on prime minister narendra modi vsk 98
Next Stories
1 “…मग हवं तर मन की बात पण सांगा” ; राहुल गांधींनी मोदींवर साधला निशाणा!
2 COVID19 : देशभरात मागील २४ तासांत ५७ हजार ९४४ रूग्ण करोनामुक्त ; रिकव्हरी रेट ९६.७५ टक्के
3 मायावतींची घोषणा ; उत्तरप्रदेश, उत्तराखंडमधील विधानसभा बसपा स्वबळावरच लढवणार!
Just Now!
X