अभिषेक अंगद, रांची

राष्ट्रीय नागरिकत्व पडताळणी आणि नोंदणी आसामपुरती नसून संपूर्ण देश त्याच्या कक्षेत आणला जाईल, तसेच ज्यांची नावे त्या यादीत नसतील त्यांना देश सोडावा लागेल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी केली.

एका हिंदी दैनिकाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. आसामातील ज्या १९ लाख लोकांची नावे नागरिकत्व नोंदणीतून वगळली गेली आहेत त्यांना त्यांची बाजू विशेष लवादासमोर मांडण्याची संधी आहे. तसेच ज्यांना वकील परवडणार नाहीत त्यांना मोफत कायदेशीर मदतही दिली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. इतर देशात घुसखोरांना राहू देत नाहीत, मग भारतातच त्यांचे वास्तव्य का, असा सवालही त्यांनी केला. त्यामुळेच नागरिक नोंदणी ही काळाची गरज आहे, असेही ते म्हणाले.