News Flash

कोळसा खाणवाटप करताना कंपन्यांकडून प्रतिज्ञापत्र घेण्याचा निर्णय

कोळसा आणि लिग्नाईच्या खाणींचे वाटप करताना केंद्र सरकार कंपन्यांकडून प्रतिज्ञापत्र घेणार आहे. त्यानुसार देशातील ४६ कोळसा आणि १५ लिग्नाइट कंपन्यांकडून गुरुवारी प्रतिज्ञापत्र घेण्यात येईल

| September 4, 2014 03:45 am

कोळसा आणि लिग्नाईच्या खाणींचे वाटप करताना केंद्र सरकार कंपन्यांकडून प्रतिज्ञापत्र घेणार आहे. त्यानुसार देशातील ४६ कोळसा आणि १५ लिग्नाइट कंपन्यांकडून गुरुवारी प्रतिज्ञापत्र घेण्यात येईल, असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले. या कंपन्यांना केंद्र सरकारकडून खाणवाटप केले जाणार आहे.
खाणींचे बेकायदा वाटप रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलेले आहे. या कंपन्यांकडून प्रतिज्ञापत्र घेऊन ते सर्वोच्च न्यायालयात दाखविण्यात येईल, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. या कंपन्यांकडून आधी केंद्र सरकार केवळ खाणवाटप केल्याचा अहवाल घेणार होती. मात्र त्यानंतर प्रतिज्ञापत्र घेण्याचाच निर्णय घेण्यात आला, असे केंद्रीय कोळसा मंत्रालयाने सांगितले.
जिंदाल स्टील अ‍ॅण्ड पॉवर लि. (जेएसपीएल), हिंदाल्को, जयस्वाल नेको, सैल, एनटीपीसी, गुजरात माइनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (जीएमडीसी), गुजरात हेवी केमिकल लि., राजस्थान स्टेट माइन्स अ‍ॅण्ड माइनरल्स आदी कंपन्यांकडून गुरुवारी प्रतिज्ञापत्र घेण्यात येईल. केंद्र सरकारने नुकतेच सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते की, कंपन्यांना खाणवाटप करताना त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र घेण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2014 3:45 am

Web Title: govt seeks affidavit from coal lignite block allottees
Next Stories
1 लोकपाल शोध समितीचे नवे नियम अधिसूचित
2 सदानंद गौडा यांच्या मुलाविरोधात अटक वॉरंट
3 जम्मू-श्रीनगर महामार्ग ठप्प
Just Now!
X